शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आसोद्यात पॅनलपद्धतीची व्यूहरचना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका, निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची व्यूहरचना आखली ...

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका, निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची व्यूहरचना आखली जात आहे. या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे पॅनलमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची, यासंदर्भात नियोजन पूर्णत्वास आले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईचा सामना असोदेकर करीत आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मूलभूत समस्यांसह पाणीटंचाईचा प्रमुख मुद्दा चांगलाच ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गावात एकूण सहा वाॅर्ड असून १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सुमारे १२ हजारांच्यावर मतदारसंख्या आहे. आतापर्यंत या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक लढविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन चेह-यांना संधी मिळण्याकरिताही प्रयत्न सुरू आहे. सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी गावाचा कारभार आपल्या हाती येण्याकरिता कंबर कसली आहे. माजी सरपंच विलास चौधरी, ग्रामपंचायत माजी सदस्य रवींद्र देशमुख, तर ग्रामीण विकास पॅनलचे प्रमुख तुषार महाजन निवडणुकीच्या आखाड्यात पॅनल उतरणेकरिता हालचाली गतिमान केल्या आहेत. पॅनलपद्धतीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. पॅनलमध्ये आपल्याच उमेदवाराचा विजय कसा होईल, याबाबतचे नियोजन व आखणी पॅनलप्रमुख करताना दिसत आहे.

पाणीटंचाईचा वनवास आसोदेकरांना पाणीटंचाई नवीन नाही. पाणीटंचाई ही आसोदेकरांना पाचवीलाच पुजलेली आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणीसमस्या सोडविण्याबाबत आश्वासन मिळते. मात्र, शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आहे. सन २०१२ पासून सुमारे पाच कोटी रुपयांची सुरू झालेली पाणीयोजनाही सन २०२० मध्ये पूर्णत्वास आली. तरीही पाणी समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईचा वनवास संपणार कधी? पुन्हा तेच आश्वासन मिळेल का, याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. सध्या महिन्यातून एकदाच गावकऱ्यांना पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.