शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाव-बेटी पढाव’ चा संदेश देणारी डिजिटल गुडीया कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 13:43 IST

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे सन्मान झालेल्या डिजिटल गुडीया कोमात गेल्याने मानवी गुडीया वाचवण्याच्या अभियानाचा फज्जा उडालेला आहे.

 जिल्हाधिका:यांची बदली होताच दुर्लक्ष : शासकीय अधिका:यांकडून उद्देशाला ‘दे धक्का’

ऑनलाईन लोकमत विशेष /संजय पाटील  
अमळनेर, दि.12- ‘बेटी बचाव , बेटी पढाव’ मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. देशभरात सर्वाचे आकर्षण ठरलेली आणि पंतप्रधान व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे सन्मान झालेल्या डिजिटल गुडीया कोमात गेल्याने मानवी गुडीया वाचवण्याच्या अभियानाचा फज्जा उडालेला आहे.
जळगावच्या तत्कालिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी शासनाच्या ‘बेटी बचाव-बेटी पढाव’  या मोहिमेला अधिक चालना दिली. जिल्ह्यातील कमी होत असलेला मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम म्हणून बोलणारी डिजिटल गुडीया तयार केली. यासा:याची दखल केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्याकडून कौतुक झाले होते. जिल्हाधिका:यांनी ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी सर्व उपविभागीय, तहसील, नगरपालिका, पंचायत समित्या , ग्रामीण रुग्णालय, बांधकाम विभाग, कृषी विभागात डिजिटल गुडीया लावण्याचे आदेश काढले. या कार्यालयात येणा:या प्रत्येक नागरिकानी ही संकल्पना पहावी व बेटी बचाव साठी जनजागृती व्हावी, असा त्यामागील उद्देदेश होता. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे गुडीयाच्या हातातील पाटी मधील दूरदर्शन संचातुन ‘बेटी बचाव बेटी पढाव’ बाबत जागृती करण्यात आली. मात्र तांत्रिक सुविधेअभावी अवघ्या दोन दिवसानंतर ही गुडीया मुकी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही संदेश यात होते म्हणून विविध निवडणुकांच्या आचार संहिता लागल्याने डिजिटल गुडीया बंद करण्यात आली. अधिका:यांच्या कार्यालयात नागरिकांच्या समस्या, तक्रारी, मोर्चे ,बैठका यांच्या वर्दळीमुळे गुडीयाचा आवाज नकोस झाला. कामात अडथळा नको म्हणून म्हणून ते बंद करण्यात आले. नंतर कार्यालयातील शिपायानीही कधी गुडीयाला बोलते केले नाही. त्यातच जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची शिर्डी येथे बदली झाली. जिल्हाधिका:यांच्या बदलीसोबतच डिजिटल गुडीया ही संकल्पना देखील मागे पडली. यासा:यात शासनाने या डिजिटल गुडियावर केलेला खर्च हा वाया जात आहे. लोकमत ने केलेल्या सर्वेक्षणात सर्वच कार्यालयातील गुडीया मुक्या झालेल्या आहेत. दरम्यान या गुडीया कार्यालयाच्या बाहेर आवारात लावाव्यात आणि दररोज सुरु ठेवाव्यात अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे