शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शाडू माती गणेशमूर्तीचा पॅटर्न राज्यभर पोहचविणार - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:14 IST

शाडूमातीच्या श्री गणेशमूर्ती वितरण केंद्राचा शुभारंभ

ठळक मुद्देगणेश मंडळांना शाडूच्या मूर्तीचे आवाहनपर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्तीमुळे प्रदूषण रोखणे शक्य बालपणाच्या आठवणींना उजाळा

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 10 - पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्तीमुळे प्रदूषण रोखणे शक्य असल्याने यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होतो. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्ती वापराबाबतचा विषय  मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य स्तरावर पोहचवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. पर्यावरणपूरक आणि धर्मशास्त्रानुसार सुसंगत अशा शाडूमातीच्या श्री गणेशमूर्तीचे वितरण केंद्र टॉवर चौकात  श्री कला केंद्राच्यावतीने उभारण्यात आले असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते 10 ऑगस्ट रोजी करण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, अॅड. सुशील अत्रे, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दीपक जोशी उपस्थित होते. शाडू मातीच्या मूर्ती बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यास प्रशासनावरचा भार कमी होईल. अशा उपक्रमांना प्रसिध्दी मिळायला हवी, अशीही अपेक्षा  जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बालपणाच्या आठवणींना उजाळा देऊन या मूर्तीचे कौतुक केले. या मूर्तीकडे पाहून प्रसन्नता वाटत आहे, इतर मूर्ती आणि या मूर्तीमध्ये खूप फरक आहे,  असे उपक्रम सर्वानी आयोजित करून याचा प्रसार करायला हवा, अशी अपेक्षा जिल्हाधिका:यांनी व्यक्त केली.  

यावेळी सचिन नारळे यांनी सांगितले की, शहरातील सर्व गणेशमंडळांना आम्ही आवाहन केले आहे की, मंडपातील श्रींची मूर्ती शाडूमातीचीच बसवावी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद आहे. अधिक माहितीसाठी  संपर्क साधण्याचे आवाहन  श्री कलाकेंद्राच्या वतीने अनिता पोळ यांनी केले. सूत्रसंचालन श्री कला केंद्राचे रवींद्र हेंबाडे यांनी केले.