शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दहा तासात दहा टन निर्माल्य संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST

खिर्डी : गणेशोत्सव दरम्यान होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्था व सिव्हिल सोसायटी वरणगाव यांच्या ...

खिर्डी : गणेशोत्सव दरम्यान होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्था व सिव्हिल सोसायटी वरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हतनूर जलाशयावर गणपती व निर्माल्य संकलन मोहीम हाती घेण्यात आली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी जलाशयालगतच्या वरणगाव, टहाकळी, सावदा, फैजपूर, तांदलवाडीसह अनेक लहान-मोठ्या शहर व खेड्यापाड्यांवरील सार्वजनिक तसेच घरगुती गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी हतनूर धरणासमोरील पुलाच्या दोन्ही बाजूने गणेश विसर्जन करण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या पाश्वभूमीवर वरणगाव पोलिसांनी टहाकळी फाट्यानजीक कडक बंदोबस्त ठेवून गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना निर्माल्य व गणेश मूर्ती चातक व सिव्हिल सोसायटीने राबविलेल्या उपक्रमास सहकार्य करण्यासाठी आवाहन केले. नदीपात्रात टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याला आळा बसावा यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्था व सिव्हिल सोसायटी वरणगावच्या कर्मचाऱ्यांनी भरउन्हात सकाळी दहा वाजेपासून रात्रीच्या आठ वाजेपर्यंत दहा तासांत दहा टन निर्माल्य व गणेश मूर्ती संकलनाला सुमारे २५ स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.

हतनूर धरणावर गणेश विसर्जनासाठी येणारे भाविक व मंडळांना चातक व सिव्हिल सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी निर्माल्य नदीत टाकल्याने तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. तसेच जनजागृती व प्रबोधनात्मक निर्माल्य संकलनाचे फलक लावण्यात आले. ‘पीओपी’च्या मूर्ती न घेता, शाडू मातीच्या मूर्ती घेण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण निर्माल्य संकलन करून प्लॅस्टिक, नारळ, हार, फुले तसेच जुन्या मूर्ती हे वेगवेगळे करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच फुलांपासून विघटन करून गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरून वृक्षसंवर्धनासाठी उपयोगी आणण्यात येणार आहे.

चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, समीर नेवे, विनायक सपकाळे, मनोज बडगुजर, संजय पाटील, प्रशांत पाटील, सौरभ महाजन, पियूष महाजन, पार्थ बऱ्हाटे तसेच वरणगाव सिव्हिल सोसायटीचे डॉ. राहुल भोईटे, रामचंद्र पाटील, पुष्कर भोईटे, नीलेश झोपे, ज्ञानेश्वर पाटील, श्रीराम सनंसे आदी कर्मचारी उपस्थित होते.

गणपती संकलन करताना चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रशांत पाटील, संजय पाटील आदी.