शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कडाका कायम; शेकोट्या लागल्या पेटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 14:53 IST

डिसेंबर अखेरमध्ये अपेक्षेप्रमाणे थंडीचा तडाखा कायम असून थंडी वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसू लागल्याआहेत.

वासेफ पटेलभुसावळ : डिसेंबर अखेरमध्ये अपेक्षेप्रमाणे थंडीचा तडाखा कायम असून थंडी वाढल्याने ठिकठिकाणी पेटवलेल्या शेकोट्या दिसू लागल्याआहेत. पेटलेल्या शेकोट्या पाहताच रस्त्याने आलेल्या माणसाचे पाय आपोआप शेकोटीकडे उब घेण्यासाठी वळतात.उत्तरेकडील वाहणाऱ्या शीत वाऱ्यांनी शहरातील किमान तापमानात सातत्याने घट होत आहे .हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात सतत चढ-उतार होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. शहरात रात्रीच्या वेळेस गार वारा वाहत असून दुपारच्यावेळी बोचरी थंडी जाणवत आहे. उन्हात उभे राहून ऊब घेताना नागरिक ठिकठिकाणी दिसत आहेत.थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर निघणे अवघड होत आहे. थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांनी विशेष खबरदारी घेतली जात आहे.कसरत करणाऱ्यात वाढथंडी हा आरोग्यदायी ऋतू असतो. यामुळे या ऋतूमध्ये सकाळ-संध्याकाळ शरीरावर मेहनत घेऊन आरोग्याच्यादृष्टीने कसरत करणाऱ्यांच्या संख्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील जिम फूल झाल्या असून, मॉर्निंग वॉकमध्येही नागरिकांची संख्या वाढताना दिसून येत आहे.रब्बी हंगामासाठी थंडीचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे.थंडीने चांगला जोर धरला असला तरी मागील आठवड्याच्या तुलनेत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची तीव्रता अल्पशी कमी झाली आहे.मागील काही दिवसांत किमान तापमान हे १० ते १४ अंश सेल्सीअसमध्ये स्थिरावले आहे. मागील आठवड्यातदि. २६ - १४℃दि. २५ - १३℃दि. २४ - ११℃दि. २३ - ११℃दि. २२ - १०℃दि. २१ - ११℃असे किमान तापमानाचे स्वरूप होते. दि. ३१ डिसेंबरपर्यंत किमान तापमान हे १२℃ ते १४℃ दरम्यान राहणार आहे.जानेवारीच्या पहिल्या मात्र थंडीचा जोर कमी होण्याचे संकेत आहेत, पण दुसऱ्या आठवड्यात पुन्हा तीव्रता वाढेल, अशी माहिती वेलनेस वेदरचे हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.चहाचा विक्रीत लक्षणीय वाढशरीरात ऊब राहावी याकरिता थंडीच्या तडाख्यात गरमागरम चहा व भजे ची मजा घेताना नागरिक दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत चहा विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.सकाळी दाट धुक्याची चादरभल्या पहाटे संपूर्ण परिसरांमध्ये दाट धुक्याची चादर दिसत असून यातून चाकरमान सकाळी-सकाळी कामानिमित्त जाताना दिसत आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले असून रात्रीच्या वेळेस ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून आपलाच उमेदवार कसा निवडून येईल याविषयी चर्चा होताना दिसत आहे.