शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने खोबरे ३०० रुपयांच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानंतर खोबऱ्याच्या आवकवर परिणाम होऊन त्याच्या भावात थेट ६० ते ८० रुपये ...

विजयकुमार सैतवाल

जळगाव : केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानंतर खोबऱ्याच्या आवकवर परिणाम होऊन त्याच्या भावात थेट ६० ते ८० रुपये प्रति किलोने वाढ झाली झाली आहे. यामुळे खोबऱ्याचे भाव थेट २६० ते २८० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. दिवाळीपर्यंत आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ यांच्या आवकवर सध्या कोणत्या न कोणत्या कारणाने परिणाम होत आहे. कोकणातील पूरस्थिती, अफगाणिस्तानील तणाव, विविध देशांतील कोरोना संसर्ग यामुळे काजू, बदाम तसेच इतर सुकामेव्यासह मसाल्याची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढले आहे. या सोबतच आता मसाल्यातील महत्त्वाचा घटक असलेले खोबरे व खसखसच्या आवकवरही परिणाम झाला आहे.

२५ टक्क्यांनी आवक घटली

खोबऱ्याची प्रमुख आवक असलेल्या केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथून येणाऱ्या खोबऱ्याच्या आवकवर चांगलाच परिणाम झाला आहे. एरव्ही दररोज दोन टन आवक असलेल्या खोबऱ्याची आवक २५ टक्क्यांनी कमी होऊन ती दीड टनवर आली आहे. यामुळे २०० ते २२० रुपये प्रति किलो असलेल्या खोबऱ्याचे भाव २६० ते २८० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.

दिवाळीपर्यंत ३०० रुपयांवर?

सध्या आवक कमी व सणवारामुळे मागणी वाढणार असल्याने खोबऱ्याचे भाव आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. दिवाळीमध्ये खोबऱ्याची मागणी जास्त असते. त्यामुळे या काळात खोबरे ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

केरळमधून येणाऱ्या खोबऱ्याची आवक कमी झाल्याने त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दिवाळीपर्यंत खोबरे ३०० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. खोबऱ्यासोबतच खसखसचेही भाव वाढले आहेत.

- सचिन जैन, मसाले विक्रेते