शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर बंद व वाहन निरीक्षकाअभावी ‘आरटीओ’ कार्यालयात गोंधळ

By admin | Updated: February 22, 2017 00:43 IST

वाहनधारकांचे हाल : ‘एमआयडीसीत’ही वाहनांच्या रांगा

जळगाव : सर्व्हर वारंवार बंद पडणे, संथ गती त्यातच खंडित वीजपुरवठा यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. वारंवार अडचणी निर्माण होत असल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता तर औद्यागिक वसाहतमध्ये योग्यता प्रमाणपत्रासाठीही प्रचंड गर्दी झाली होती. वाहन निरीक्षक नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या वाहनधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.रात्री उशिरा पर्यंत गर्दी कायम होती. दोन्ही ठिकाणी वाहन धारक व कर्मचाºयांमध्ये किरकोळ वादही झाले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाचे अनेक टप्पे आॅनलाईन झाले आहेत. १ फेब्रुवारी सारथी-४ ही प्रणाली आॅनलाईन प्रणाली सुरु झाल्याने शिकाऊ परवाना याच प्रणालीद्वारे काढावा लागत आहे. त्यातच वारंवार सर्व्हर बंद पडणे, कधी त्याला गती नसणे तर कधी वीज पुरवठा बंद होणे यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. अनेक उमेदवार दिवसभर थांबून आल्या पाऊले माघारी जात आहेत.आठ संगणकावर चालते कामपरिवहन कार्यालयात परवान्यासाठी आठ संगणक आहेत. त्यात इंटरनेटच्या दोन लाईन देण्यात आल्या आहेत. एका लाईनवर आयएमव्ही व व्हेरीफीकेशन तर दुसºया लाईनवर परीक्षा घेतली जाते. उमेदवारांच्या मते सर्व्हरची गती कमी असल्याने दोनच संगणकावर हे काम घेण्यात येत आहे तर अधिकाºयांच्या मते आॅनलाईनमुळे नेहमीप्रमाणे उमदेवार येत नाहीत, त्यामुळे काही वेळा संगणक बंद असतात. मंगळवारीही प्रचंड हाल झाले.वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आज संगणक बंद होते, त्यामुळे किरकोळ गोंधळ उडाला. सर्वच कार्यालये आॅनलाईन असल्यामुळे काही वेळा सर्व्हरची गती कमी होते. सध्या उमेदवारच कमी येत असल्याने परवाने कमी निघतात. दोन दिवस काम बंद असल्याने योग्यता प्रमाणपत्रासाठी आज गर्दी झाली.-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीदुपारपर्यंत निरीक्षकच नसल्याने वाहनधारकांचा संताप गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक व निरीक्षकांच्या परिक्षेमुळे कार्यालयात वाहन निरीक्षक नसल्याने योग्यता प्रमाणपत्राचे काम चार दिवस बंद होते. मंगळवारी हे काम सुरु होणार असल्याने वाहनधारकांना सकाळपासून एमआयडीसीत बोलावण्यात आले होते, मात्र दुपारपर्यंत निरीक्षकच नसल्याने वाहनधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वादाचे प्रसंग घडले. तेथे वाद सुरु असल्याचे समजताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी तातडीने निरीक्षकांना तेथे रवाना केले.