जळगाव : एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुलांची रविवारी रात्री अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या निषेधार्थ भादली येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मारेकऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी भादली बुद्रुक गावात मंगळवारी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकरी, शेतमजुरांनीही काम बंद ठेवले. पोलिसांनी मंगळवारी घटनेच्या तपासासाठी ३५ जणांची चौकशी केली. त्यात काही धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सामूहिक हत्याकांडामुळे भादली येथे बंद
By admin | Updated: March 22, 2017 02:04 IST