शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा पाणीप्रश्न पेटला..

By admin | Updated: May 16, 2014 14:42 IST

धुळे : शहरात तीन आठवड्यापासून जाणवणार्‍या पाणीटंचाईचे पडसाद आज महासभेत उमटले.

धुळे : शहरात तीन आठवड्यापासून जाणवणार्‍या पाणीटंचाईचे पडसाद आज महासभेत उमटले. मुस्लीमबहुल वस्तीतील नगरसेवकांनी महासभा सुरू होताच हंडे घेऊन पाणीप्रश्न सोडविण्याची जोरदार मागणी केली. तब्बल वीस मिनिटे वादग्रस्त चर्चा होऊन पाणीप्रश्नावर स्वतंत्र चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नगरसेवकांनी मोर्चा मागे घेत सभागृहात पदार्पण केले. महापौर जयश्री अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा झाली. सभा सुरू होताच नगरसेवक फिरोज शेख, अमीन पटेल, जुलाह रश्मी बानो, अशरद शेख, साबीर पत्रकार आदी नगरसेवकांनी हंडे घेऊन महासभेत प्रवेश करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. सत्ता असूनही पाण्यासाठी आंदोलन करावी लागत असल्याची खंत फिरोज शेख यांनी व्यक्त केली. उपमहापौर फारूख शहा व सभागृहनेते कमलेश देवरे यांनी आंदोलनकर्ते नगरसेवकांशी चर्चा केली. विषय पत्रकेवरील विषय झाल्यानंतर पाण्यावर पुन्हा चर्चा करण्यात आली. आत्मदहनाचा ईशारा मायक्रो जलकुंभावर पंपींग स्टेशन नाही. त्यामुळे पुरेशे पाणी नागरिकांना मिळत नाही. हे पपींग स्टेशन ३१ मेपर्यंत बसविण्यात आले नाही तर मनपात आत्मदहन करण्याचा इशारा फिरोज शेख व अमीन पटेल यांनी दिला. पाण्यासाठी वनवन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम मनपा प्रशासनाचे आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी येत नाही. जे पाणी येते तेही दुर्गंधीयुक्त असते, असे मायादेवी परदेशी यांनी सांगितले. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अधिकारी मोबाईल उचलत नाहीत. आयुक्त लक्ष देत नाहीत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा. प्रशासनाने जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे विरोधी पक्षनेते गुलाब माळी म्हणाले. पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. प्रभागातील हातपंपही बंद आहेत, अशी तक्रार प्रतिभा चौधरी यांनी केली. पाणीटंचाईला मनपा प्रशासन जबाबदार असून ते वेळ काढूपणा करीत आहे. त्यांची शासनाकडे तक्रार करण्यात यावी, अशी मागणी मनोज मोरे यांनी केली. आम्हालाही समजून घ्या नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे खुलासा करताना अभियंता कैलास शिंदे म्हणाले की, तापी योजनेची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला. तो सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. एकाचवेळी सर्वच भागात पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे आम्हालाही समजून घेत सहकार्य करावे. नागरिकांना वेठीस धरू नका शहरातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक अडचणींवर मात करून गांभीर्याने पाणीप्रश्न १५ दिवसात सोडवा, असे आदेश महापौर जयश्री अहिरराव यांनी प्रशासनाला दिले. त्यांना सांगितले की, सर्व गळत्या काढून दुषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी. उपायोजना करण्यासाठी प्रस्ताव तयार करा. कोणतीही जबाबदारी झटकू नये. व्हॉल्व्हमन व वॉचमन जलकुंभाच्या ठिकाणी आढळून येत नाही. त्यामुळे कामात कसुर करणार्‍याचा अहवाल तयार करून कारवाई करावी. पाण्यासाठी शहरातील नागरिकांना वेठीस धरता कामा नये. १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास विशेष सभा घेऊन मनपा प्रशासनावर कारवाई करण्यासाठी ठराव करून तो नगरविकास विभागाच्या सचिवांकडे पाठविण्याचा ईशाराही महापौर अहिरराव यांनी दिले. १५ दिवसात नियोजन सदस्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केल्यानंतर आयुक्त दौलतखॉ पठाण यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, प्रशासनाची रचना सदस्यांनी समजून घ्यावी. आयुक्त म्हणून जबाबदारी माझी आहे. परंतु थेट व्हॉल्व्हमनपर्यंत जाऊ शकत नाही. तसेच पाणीपुरवठा करताना तांत्रिक अडचणी येतात. विशेष म्हणजे तापी योजना ही १९८६ मध्ये कार्यान्वित झाली आहे. तेव्हापासून तीची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. तसेच शाखा अभियंत्यांनाच पाणीपुरवठ्याचा पदभार दिला आहे. त्यांनी कधीच तक्रारी केलेल्या नाहीत. खरे तर पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र ४१ पदांची आवश्यकता आहे. ती भरण्याची प्रक्रिया प्रशासनस्तरावर सुरू झाली आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता २२ जलकुंभांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत १३ जलकुंभ आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिडर असतानाही भारनियमन होते. त्यामुळेही पाणीपुरवठ्याला व्यत्यय येतो. सर्व तांत्रिक बाबींवर मात करून येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. महासभा परिणामकारक ठरली.