शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उष्णतेचा कहर...

By admin | Updated: March 30, 2017 00:01 IST

शहराचा पारा ४२ अंशावर : सात वर्षातील सर्वाधिक तापमान

जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा ४२.८ अंशावर पोहचला असल्याने तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. जळगाव शहराचे तापमानाने मार्च महिन्यातच चाळीशी पार केल्याने जळगावकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषित संचारबंदी असल्याचा भास जाणवत आहे. महाराष्टÑात सध्या कोरड्या व उष्ण वाºयांचा म्हणजेच ‘लू’ वाºयांचा प्र्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे. जळगाव शहराच्या तापमानाने ४२ अंशाचा पारा गाठला आहे. मार्र्च महिन्यात जळगाव पाºयाने ७ वर्षानंतर पहिल्यांदाच ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी  २०१० मध्ये जळगावचा पारा ४१ अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात ४२.८ अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्तेदेखील ओस पडलेले पहायला मिळत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.आठवडाभर राहणार कहर कायम  उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वाºयांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याकडून देण्यात आली आली आहे. ‘लू’ वाºयाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने अजून आठवडाभर तरी जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शहराचा पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचेदेखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी ३ तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाड्यामुळे घरात राहणेदेखील शक्य होत नाही.जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच येत्या आठवड्यात १३ क्रमांक वार्ड मध्येदेखील उष्माघात कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली. दरवर्षी एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यात उष्माघात कक्ष सुरू केला जातो. मात्र यंदा मार्च महिन्यातच उष्माघात कक्ष सुरूझाला.