शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

जळगाव : विविध प्रकारच्या व्यावसायाची जाहिरात, विविध कंपन्यांच्या वस्तुंची, वाढदिवस, दुकानाचे उद्घाटन, प्रदर्शन, यश, निवड, यासह अगदी जन्म कुंडली ...

जळगाव : विविध प्रकारच्या व्यावसायाची जाहिरात, विविध कंपन्यांच्या वस्तुंची, वाढदिवस, दुकानाचे उद्घाटन, प्रदर्शन, यश, निवड, यासह अगदी जन्म कुंडली बनविण्यापासून तर घरगुती जेवणाच्या मेस उपलब्ध असण्याबाबत विविध ठिकाणी लावण्यात आलेले जाहिरातींचे फलक शहराच्या विद्रुपीकरणात हातभार लावत आहे. विशेष म्हणजे काही नागरिकांनी तर झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचा फलक लावल्यामुळे झाडांचेही नुकसान होत आहे. महापालिकेचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

`लोकमत` प्रतिनिधीने शहरातील विविध भागातील रस्ते व चौकांची पाहणी केली असता, अनेक लहान-मोठे अनाधिकृत जाहिरातींचे होर्डींगज दिसून आले. विशेषत : नवीन बस स्थानक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, प्रभात चौक, बेंडाळे चौक, टॉवर चौक व नेहरु चौक या ठिकाणच्या प्रत्येक चौकमध्ये इमारती, झाडे, विद्युत खांब या ठिकाणी लहान व मोठे असे ८ ते १० फलक लावलेले दिसून आले. यातील काही फलक जुने होऊन फाटलेले आढळले. नेहरू चौकात विद्युत खांब्यावर लावलेला एका सिमेंट कंपनीचा फलक ‌‌‌‌‌वाऱ्याने फाटून उलटा झालेला दिसून आला. तर स्टेडियम चौकात एका निंबाच्या झाडाला खिळा अडकवून, जाहिरातीचा फलक ठोकल्यामुळे झाडाचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे खिळा ठोकल्यामुळे या झाडाची अनेक ठिकाणी `सालटे` निघालेले दिसून आली.

इन्फो :

खाजगी होर्डिंगज मधुन सर्वाधिक कमाई :

महापालिकेतर्फे शहरात २५० खाजगी ठिकाणी जाहिरातीचे फलक लावण्याची परवानगी देण्यात येत असून, यातून वर्षाला मनपाला ३० लाखांचे उत्पन्न मिळत आहे. तर ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा आहेत, अशा ठिकाणी मनपाकडून जाहिरातीचा फलक लावणाऱ्यांकडून १ रूपये चौरस मीटरप्रमाणे जाहिरातीच्या फलकाचे पैसे आकारले जातात. यातुन मनपाला वर्षा १० ते ११ लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

इन्फो :

प्रशासनाच्या डुलक्या :

-शहरात मनपाची अधिकृत परवानगी घेऊनच, कुठल्याही जाहिरातीचे होर्डिंंग लावण्याची परवानगी आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी वाढदिवस, यश-निवडीचे अनाधिकृत होर्डिंग लागले असतांना, मनपाकडून यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.

- शहरात महावितरणचे विद्युत खांब आणि झाडांवर जाहिरातीचे होर्डिंग लावण्याला परवानगी नाही. असे असतांना अनेक रस्त्यांवरील झाडांवर व विद्युत खांबावर सर्रासपणे जाहिरातीचे होर्डिंग लागलेले आहेत. मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झालेली नाही.

-मनपाकडून अनाधिकृत होर्डिंग दिसल्यास जप्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संबंधित होर्डिंग ज्या नागरिकाने लावले आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे, शहरात दिवसेंदिवस अनाधिकृत होर्डिंगची संख्या वाढून शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे.

इन्फो :

शहरात आम्ही परवानगी धारकानांच जाहिरातीचा फलक लावण्याची परवानगी आहे. अनाधिकृत जाहिरातीचा फलक दिसल्यावर जप्त करण्यात येतो. तसेच झाडे व विद्युत खांब्यावरही जाहिरातीचा फलक लावण्याला बंदी असून, त्यांच्यावरही कारवाई सुरूच असते.

नरेंद्र चौधरी, कर विभाग प्रमुख, मनपा.