शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जनआधार संघटनेच्या मोर्चाने दणाणले शहर

By admin | Updated: April 3, 2017 22:55 IST

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हटवावे, सर्वसाधारण सभा रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी जनआधार विकास

भुसावळ : पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हटवावे, सर्वसाधारण सभा रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी जनआधार विकास पार्टीतर्फे जोरदार घोषणाबाजी करीत यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून सोमवारी सकाळी ११ वाजता पायी मोर्चा काढण्यात आला़ प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या मांडला़ मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले़दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी वाढलेली घरपट्टी रद्द करावी तसेच नगरसेवकांविरुद्ध दाखल असलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या आशयाचे फलक दर्शवून लक्ष वेधले़ मोर्चेकऱ्यांनी काही वेळ मांडलेल्या ठिय्या आंदोलनामुळे यावल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली़ शहर पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त राखण्यात आला़ मोर्चा प्रसंगी सचिन चौधरी, माजी नगरसेवक जगन सोनवणे, नगरसेविका पुष्पा सोनवणे, प्रदीप देशमुख, एस़पी़देशमुख, सिकंदर खान, खान शब्बानाबी, दुर्गेश ठाकूर, पुष्पा चौधरी, हरीष बोरसे, राहुल बोरसे, लता पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती़मुख्याधिकारी यांना निलंबित करण्याची मागणीजनआधार विकास पार्टीतर्फे विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले़ निवेदनाचा आशय असा की, पालिकेची २७ रोजी झालेली सर्वसाधारण सभा रद्द करावी, १० टक्के ऐवजी तीन पटीने होत असलेली करवसुली सक्तीने थांबवावी, सत्ताधाऱ्यांनी ९० दिवसात दिलेले मूलभूत सुविधांची आश्वासन फोल ठरल्याने नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, बेजबाबदार मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करावे, जनआधार विकास पार्टीच्या तीनही नगरसेवकांविरुद्ध दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, २७ रोजीच्या सभेत घेण्यात आलेले विषय न्यायप्रविष्ट असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी न्यायालयाची अवमानना केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले़ मुख्याधिकाऱ्यांना हवे संरक्षण, भाजपाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन४भारतीय जनता पार्टी व अपक्ष आघाडीतर्फे सोमवारी दुपारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले़ जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती़ याप्रकरणी संबंधितांविरोधात पोलिसात गुन्हादेखील दाखल केला आहे़ कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यांवर काही राजकीय व्यक्ती, त्यांचे समर्थक व त्यांचे कार्यकर्ते हल्ला करण्याची शक्यता आहे़ त्यामुळे बाविस्कर यांना संरक्षण देण्याची मागणी शिष्टमंडळाने प्रांतांना केली़ ४सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांवर अ‍ॅट्रासिटी, लूटमार, छेडछाड यासारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे़ हे गुन्हे न्यायालयाच्या माध्यमातून दाखल करण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ मुख्याधिकारी नियमानुसार काम करीत आहेत मात्र बेकायदेशीर कामांना नोटीस देणे, त्यास विरोध करणे, बेकायदेशीर ठरावांना विरोध करणे, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे असे प्रकार शहरात सुरू आहेत़४निवेदनावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, प्रमोद नेमाडे, रमेश नागराणी, महेंद्रसिंग ठाकूर, प्रीतमा महाजन, सोनल महाजन, पुष्पाबाई बत्रा, प्रतिभा पाटील, मंगला आवटे, बोधराज चौधरी, सुषमा पाटील, अनिता सोनवणे, मुकेश पाटील, किरण कोलते, शोभा नेमाडे, राजेंद्र नाटकर, शैलजा नारखेडे, निर्मलकुमार कोठारी, लक्ष्मी मकासरे, अमोल इंगळे, रवींद्र खरात, प्रा़सुनील नेवे, दीपाली बऱ्हाटे यांच्या सह्या आहेत़