शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोर बिबटय़ाला नागरिकांनी हुसकावले, मात्र महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 17:21 IST

चाळीसगाव तालुक्यातील घटना

ठळक मुद्देआडगाव-उंबरखेड शिवारात, गिरणा-वरखेड परिसरात पिंपळवाड-म्हाळसा, तामसवाडी, सायगाव, मांदुर्णे परिसरात बिबटय़ाचे दर्शन होत आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात गेल्या आठवडय़ात महिलेच्या मृत्यूनंतर पुनश्च हल्ला केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बिबटय़ाने हल्ला केल्याची दररोज एकतरी माहिती समोर येत आहे. परिणामी वनविभागाने बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

ऑनलाइन लोकमत उंबरखेड, ता.चाळीसगाव, जि.जळगाव, दि.26 : बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात भारती सतीश देवकर (वय 25) ही महिला जखमी झाल्याची घटना पिंपळवाड-म्हाळसा, ता.चाळीसगाव येथे मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. दरम्यान, हल्लेखोर बिबटय़ाला सोबत असलेल्या नागरिकांनी हुसकावून लावल्याने ही महिला बचावली. बिबटय़ाने नागरी वस्त्यांमध्ये हल्ला करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. गेल्या आठवडय़ात अलका गणपत अहिरे यांचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या आठवणी ताज्या असतानाच बिबटय़ाने पुन्हा भारती देवकर या महिलेवर शेतात हल्ला केला. ही महिला स्वत:च्या कपाशीच्या शेतात निंदणी करीत असताना ही घटना घडली. बिबटय़ाने छलांग मारून महिलेचा गळा पकडला व तिच्या दंडाला चावा घेतला. सुदैवाने या वेळी हजर असलेल्या इतर महिलांनी धाडस दाखविले व बिबटय़ावर दगड मारून त्याला हाकलून लावले. यामुळे बिबटय़ाने तेथून पळ काढला. या घटनेत ही महिला जखमी झाली असून, उपचारार्थ चाळीसगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी बिबटय़ाने हल्ला करून 40 हजार रुपये किमतीचा बैल, यानंतर दुस:या दिवशी म्हशीच्या पारडूवर हल्ला केला. बिबटय़ाच्या सातत्याने होत असलेल्या हल्ल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. वनविभागाने बिबटेाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.