शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात तरुणाला चोप

By admin | Updated: February 10, 2017 00:52 IST

रुग्णालयात गर्दी : डॉक्टरांच्या दालनातच घडली घटना

जळगाव : जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या महिलेला वाईट हेतूने स्पर्श करणा:या तरुणाला महिलेच्या नातेवाईकासह अन्य जणांनी चोपल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता बाह्यरुग्ण कक्षातील 116 क्रमांकाच्या डॉक्टरांच्या दालनात घडली. ही घटना घडली तेव्हा डॉक्टर दालनात उपस्थित नव्हते. महिलेला स्पर्श करणारा तरुण हा  चहा विक्री करतो.जामनेर तालुक्यातील एक महिला तिचा पती व दिर यांच्यासोबत गुरुवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात मानेच्या तपासणीसाठी आली होती. मात्र रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 1 शिवाय कुठेच डॉक्टर नव्हते व जे होते ते देखील रुग्णांची तपासणी करीत नव्हते, त्यामुळे ही महिला 116 क्रमांकाच्या दालनात गेली. तेथे डॉक्टरांची प्रतिक्षा करीत असताना रुग्णालयात चहा विक्री करणारा तरुणही त्याच दालनात आला. तो देखील मानेच्या तपासणीसाठीच आला होता. या महिलेला त्याने आजाराविषयी विचारणा केली व मानेचे कारण सांगितल्यानंतर त्या तरुणाने तेथे स्पर्श केला. त्याच वेळी महिलेचा पती तिथे आला असता हा प्रकार पाहून त्याने तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. महिलेच्या मते त्याने वाईट हेतूने हा स्पर्श केला. तर तरुणाच्या मते त्या महिलेनेच स्वत:च्या हाताने गळ्याला हात लावण्यास सांगितले.पोलिसांनी घेतले ताब्यातडॉक्टरांच्या दालनातच तरुणाला चोपले जात असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. डय़ुटीला असलेल्या पोलिसाने त्याला मारहाणकत्र्याच्या तावडीतून सोडवून चौकीत आणले. त्यानंतर हा तरुण व ती महिला या दोघांनाही पोलीस स्टेशनला नेण्यात आले. उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी दोघांची चौकशी केली. मात्र दोघांनीही तक्रार न देण्याचा निर्णय घेतल्याने कोणावरही कारवाई झाली नाही.दिवसभर डॉक्टर गायब; रुग्णांचे हालजिल्हा रुग्णालयात गुरुवारी दिवसभर डॉक्टर गायब झाले होते. त्यामुळे अनेक रुग्णांना दिवसभर त्यांची प्रतिक्षा करावी लागली. लक्ष्मण हिरामण गवळी (वय 60 रा,भुसावळ) व हरी मोहन सौनी (रा.किनोद) या दोन रुग्णांना तर अक्षरश: रडू कोसळले. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये असलेले डॉ.कुरकुरे यांनीही रुग्णांची तपासणी करण्यास नकार दिला. संध्याकाळी 116 मध्ये डॉ.सुशांत सुपे दाखल झाले. 4 महिन्यापासून सीएमओ म्हणून डय़ुटी लावली जात आहे, त्यामुळे सुटीही मिळत नसल्याने दिवसभर वेळ देणे शक्य नसल्याचे डॉ.सुपे यांनी सांगितले.