शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चोसाका भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:19 IST

शेतकरी, कामगारांचे पैसे देण्याच्या अटींवर निघाला तोडगा

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी, कामगार यांचे पैसे थकल्याने याबाबत काही महिन्यांपासून चर्चा, पत्रकार परिषदा, आंदोलने झाली. अखेर त्यावर तोडगा निघाला. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय १३ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.चोसाकावर असलेल्या प्रचंड आर्थिक कर्जामुळे वित्तीय संस्थांकडे चोसाका ची पत संपुष्टात आली. तसेच संचालक मंडळ कारखाना स्वत: सुरू करू शकत नसल्याने कारखाना भडेतत्त्वावर देण्याचा एकमेव पर्याय चोसाकासाठी होता. त्यासाठी चोसाकाने हा एकमेव विषय घेऊन शेतकरी सभासदांची तत्काळ सर्वसाधारण सभा बोलावली होती. त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पैसे व कामगारांचे थकीत पगार देण्याच्या अटीवर व भाडेतत्त्वावर दिल्यानंतर आधीच्या कामगारांना कायम ठेवण्याच्या अटीवर चोसाका भाडेतत्त्वार देण्याचा ठराव शेतकरी सभासदांनी मंजूर केला.सर्वसाधारण सभा १३ रोजी दुपारी १ वाजता चहार्डी येथील कारखाना साईटवर चेअरमन अतुल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील, माजी चेअरमन डॉ.सुरेश पाटील, अ‍ॅड.घनश्याम पाटील, पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी उपस्थित होते.दरम्यान, सभासदांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यात चर्चेचे रूपांतर वादविवादात झाले. एस.बी.पाटील यांनी भाडेतत्वावर कारखाना देण्याआधी शेतक?्यांचे पैसे, कामगारांचे थकीत पगार आणि याच कामगारांना पुढे नियमित ठेवावे. त्याबरोबरच भाडेतत्वावर दिल्यानंतर पाच जाणकार शेतक?्यांना सोबत घेऊन पुढील निर्णय चेअरमन व संचालक मंडळाने घ्यावा, असे सुचविले. त्यावर माजी चेअरमन अ‍ॅड. घनश्याम पाटील यांनी मध्यस्थी करून शेतक?्यांनी कारखाना भाडेतत्वावर देण्यास होकार दिला.यावेळी व्यसपीठावर संचालक आनंदराव रायसिंग, जिल्हा दूध संघाचे संचालक ए.डी.चौधरी, शेतकी संघाचे शेखर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी पाटील, विजय पाटील, श्यामकांत पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, गोपाळ धनगर, प्रकाश रजाळे, डॉ.पांडुरंग सोनवणे, भरत पाटील, अनिल पाटील, प्रवीण गुजराथी यांच्यासह तालुक्यातील संस्थांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव आधार पाटील यांनी केले, तर आभार चेअरमन अतुल ठाकरे यांनी मानले. प्रभारी कार्य संचालक अकबर पिंजारी, ललित महाजन आदींनी परिश्रम घेतले.