शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा-चुंचाळे रस्त्यावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:40 IST

दोन वाहने अडवून 65 हजारांचा ऐवज लुटला

ठळक मुद्दे महिला व चालकांना मारहाण10 ते 12  तरुणांचा समावेश अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि.जळगाव, दि. 26 - चोपडा-चुंचाळे रस्त्यावर रस्त्यावर निंबाचे झाड  आडवे टाकून, शस्त्रांचा धाक दाखवत दरोडेखोरांनी   सोने चांदीचे दागिने व रोख रकमेसह 65 हजारांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघ वाहनचालक किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार  चुंचाळे येथील 22 महिला ऋषीपंचमीनिमित्त शेगावला जात होत्या. 25 रोजी रात्री सव्वा अकरा ते पहाटे  साडेतीन वाजेच्या दरम्यान चोपडा-चुंचाळे रस्त्यावर  नवल नदीजवळ दरोडेखोरांनी निंबाचे झाड तोडून रस्त्यावर आडवे टाकले व वाहनांवर दगडफेक करून ती अडविली. या दरोडेखोरांमध्ये   एक 50 ते 60 वयोगटातील वयस्कर इसम व  25 ते 35 वयोगटातील 10 ते 12  तरुणांचा समावेश होता. त्याच्या हातात कु:हाड, विळा व लाकडी दांडा होता.  त्यांनी लाकडी दांडय़ाने गाडीच्या काचा फोडल्या.  शस्त्रांचा धाक दाखवून  वाहनात बसलेल्या महिलांकडून सोने चांदीचे दागिने, दोन मोबाईल असा 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी दोघ चालकांना हातावर, डोक्यावर  मारहाण  करून दुखापत करीत पळ काढला. या प्रकरणी  चालक गुरुदास भगवान पाटील (वय 42 रा. चुंचाळे, ता. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळक, सुजीत ठाकरे, दरोडा प्रतिबंधक पथक जळगाव घटना स्थळी भेट देत संपूर्ण परिसर पिंजून काढला. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे करीत आहेत.