शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा बस आगार बनले गुरांचा गोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 21:32 IST

परिसरात खड्डेच खड्डे । अवैध वाहतुकीचा विळखा

चोपडा : येथील राज्य परिवहन मंडळाचे बस आगार जिल्यात दुस?्या क्रमांकाचे मोठे आगार आहे. येथे प्रवाशांची संख्याही त्याप्रमाणात जास्तच असते. मात्र, काही महिन्यांपासून या बस स्थानकाची दुरवस्था होत चालली आहे. भोवतालच्या अतिक्रमणासोबतच प्रवाशांना बसायच्या जागेवरही गुरांचे प्राबल्य अधिक पाहायला मिळते. या सद्य:स्थितीत बदल होणे अपेक्षित आहे.जिथे प्रवासी बसायची व्यवस्थो तिथेच मोकाट गुरे बसलेली असतात. स्थानकावर सकाळी सर्वत्र शेण पसरलेले दिसते. त्यामुळे जागा असतानाही बसावे कोठे याची मोठी पंचाईत होते. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात असलेले आगार लाखोंच्या तोट्यात आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बस स्टँड आणि वर्कशॉपकडे जाणा?्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून त्यात पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. दोन्ही गेटजवळ रस्ता खूपच खराब असल्याने व खड्ड्यांत घाण पाणी साचल्याने ते प्रवाशांच्या अंगावर उडते. बस स्थानक आवारात पाटील गढी कडे जाणा?्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. स्थानकातील शौचालयाचे घाण पाणी यातून जाते. त्यामुळे या पाण्याची दुगंर्धी परिसरात पसरते. अनेकवेळाया खड्ड्यात दुचाकी व चारचाकी वाहने पडल्याने अपघात झाले आहेत. या खड्ड्यातून जाणारा घाण पाण्याचा पाईप दुरुस्त करून तत्काळ खड्डा बुजविणे गरजेचे आहे.नियमांची पायमल्लीआगाराला लागूनच अवैध प्रवासी वाहतूक खासगी वाहनांतून मोठ्या प्रमाणावर चालते. वास्तविक बस स्थानकाच्या २०० मीटरच्या आवारात अवैध प्रवासी वाहतूक होऊ नये असा नियम आहे. त्याची पायमल्ली करीत बसस्थानकात घुसून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. रस्त्याचे तीन तेराआगाराच्या आवारातील रस्त्याचे डांबरीकरण जागोजागी उखडून खड्डे पडलेले आहेत. या भागातून अवैध मागार्ने वाहने, मोटारसायकली, भाजीपाला, फळविक्रेत्यांचे गाडे, अन्य व्यावसायिकांचे गाडे, तसेच गुरांचा वावर येथेच असल्याने अनेक वेळा चालकाला मोठ्या कसरतीतून जावे लागते.या सर्व बाबींकडे आगार प्रमुखांना लक्ष देण्याची तसेच तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.