मीना जगताप यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक पेट्रेस जोसेफ गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, आण्णा काकड, अरविंद पाटील व दत्ता खोत यांनी चिन्याला कारागृहात बेदम मारहाण केली होती व त्यात त्याचा ११ सप्टेबर २०२० रोजी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबत शासन तसेच कारागृह प्रशासनाकडे तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने न्यायासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका (क्र.३९३८य२०) २२ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे. ही याचिका दाखल होताच वरील दोषींनी कारागृहातील काही व्यक्ती, राजकीय व्यक्तींना हाताशी धरून आमिषे दाखविण्याचा प्रयत्न करतानाच धमक्याही दिल्या जात असल्याचे मीना जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे. माझ्या कुटुंबीयांना काही धोका झालाच तर त्यास संबंधित व्यक्तीच जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चिन्याच्या कुटुंबीयांना अधिकाऱ्यांकडून धमक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST