शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लपाछपी खेळत असलेल्या चिमुकल्याला दिसला गळफास घेतलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:17 IST

जळगाव : चाळीस वर्षीय शेतमजुराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी वसंतवाडी येथे घडली. प्रेमराज ...

जळगाव : चाळीस वर्षीय शेतमजुराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी वसंतवाडी येथे घडली. प्रेमराज ठाकूर राठोड (वय : ४०) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. गल्लीत काही मुले लपाछपी खेळत होते. त्यावेळी राठोड यांच्या घराजवळ लपण्यासाठी गेलेल्या मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघड झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील वसंतवाडी येथे प्रेमराज राठोड हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. शेतमजुरी करून कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करायचे. पत्नी बाहेरगावी गेली होती. त्यामुळे ते व त्यांचे मुले हे घरी होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दोन्ही मुले कामाला निघून गेले़ त्यातच घरात कुणी नसताना प्रेमराज राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही चिमुकले राठोड यांच्या घराबाहेर लपाछपी खेळीत होते. एक चिमुकला हा राठोड यांच्या घराकडे लपण्यासाठी आला. त्यावेळी त्याला काचेतून राठोड हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने लागलीच परिसरातील नागरिकांना ही बाब सांगितली. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरवाजा तोडून केला प्रवेश

प्रेमराज राठोड यांनी ज्या खोलीत आत्महत्या केली. त्या खोलीचा दरवाजा बंद होता. नागरिकांना घटना कळताच, त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. नंतर दरवाजात तोडून खोलीत प्रवेश करीत राठोड कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. काहीवेळानंतर एमआयडीसी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता.

अकस्मात मृत्यूची नोंद

मृतदेह रुग्णालयात हलविल्यानंतर नातेवाइकांसह ग्रामस्थांची त्याठिकाणी गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रेमराज राठोड यांच्या पश्चात पत्नी लाचाबाई व प्रदीप आणि शुभम हे दोन मुले असा परिवार आहे. प्राथमिक तपास महेंद्र गायकवाड करीत आहेत.