अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे गावाजवळ मोठा पाईप व काटे टाकून पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काही अत्यावश्यकता असेल तरच रस्ता तात्पुरता खुला करण्यात येतो.रस्ता बंद करताना शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील, निंबा चौधरी, जयवंत पाटील, सुभाष पाटील, महेंद्र पाटील, संतोष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जीवन पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे.
अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे पूर्णत: लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 17:41 IST