शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मैदानासाठी बालकांची थेट प्रांत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 17:57 IST

 पालिका प्रशासन मैदानाकडे मुळीच लक्ष देत नाही मैदानावर वयोवृद्ध व्यक्ती व  खेळाडूंना घाणीचा, सांडपाण्याचा प्रचंड सामना करावा लागतो.   

भुसावळ :  शहरातील एकमेव हक्काचे मैदान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फटाक्यांच्या दुकानाला परवानगी देऊ नका, मैदानावरील भाज्यांची दुकाने त्वरित हलवा, मैदानाची साफसफाई करा अन्यथा  प्रांत कार्यालयातच बॅट बॉल खेळून आंदोलन करू असा  इशारा   चिमुकल्यानी दिला. जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणार्‍या शहरात खेळाडूंसाठी चांगले मैदान नाही हे मोठे दुर्दैव असून उपलब्ध असलेल्या  ओबड-धोबड अशा डॉ.  आंबेडकर मैदानावर खेळाडू   कसातरी सराव करतात.  पालिका प्रशासन मैदानाकडे मुळीच लक्ष देत नाही मैदानावर वयोवृद्ध व्यक्ती व  खेळाडूंना घाणीचा, सांडपाण्याचा प्रचंड सामना करावा लागतो.   दरवर्षी काही ना काही  निमित्ताने व्यवसायिक वापरासाठी मैदानचा वापर करण्यात येतो. यामुळे  उपलब्ध असलेल्या मैदानाची परिस्थिती अजूनही बिकट होत आहे, शिवाय पालिका प्रशासनाकडून अमृत योजनेच्या कामाचा सर्व  गाळ मैदानावर आणून टाकून दिलेला आहे.  मैदाना  मागील भागातून  मेन रोड असलेल्या पाईपलाईन मधून सतत पाण्याचा अपव्यय होतो. यामुळे डेंगू सारखे आजार होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तात्पुरत्या स्वरुपात भाजीपाला विक्रेत्यांना मैदानावर दुकाने थाटण्याची मुभा दिली होती, मात्र यानंतरही भाजीपाला व्यवसायिक मैदानावर  दुकान थाटत आहे. यामुळे मैदानावर सर्वत्र भाजीपाल्याचा कचरा होतो तसेच रात्रीच्या वेळेस  मैदानात दिवे नसल्यामुळे सर्वत्र काळोख  असतो.  याचा गैरफायदा घेत याठिकाणी दारूच्या पार्ट्या होतात. यातूनच गुन्हेगारी वृत्ती निर्माण होत आहे. फोडलेल्या बाटल्या मुळे खेळाडूंना खेळताना काही वेळेस इजा पोहोचते. हे पाहता मैदानाची त्वरित साफसफाई करावी मैदानाचा कुठलाही व्यवसायिक वापर टाळावा,  असा निवेदनात दिलेला आहे.  निवेद देताना चिमुकले हे बॅटबॉलसह संबंधित पोशाखातच प्रांत कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी ते गेले होते .