शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:11 IST

हिवरखेडा ता. जामनेर येथील दुर्घटनेने पोळा सणावर विरजण पडले आहे. गाव शोकसागरात बुडाले आहे.

ठळक मुद्दे मयत प्रदीप कुटुंबातील एकुलता मुलगा
लोकमत ऑनलाईनवाकोद जि. जळगाव, दि. 21- येथून जवळच असलेल्या हिवरखेडा दिगर ता. जामनेर येथे पोळा सणानिमित्त वाघूर नदीवर बैल धुण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. कुटुंबातील एकुलत्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावातील पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले. हिवरखेडा दिगर येथील संजय नामदेव पवार यांचा मुलगा प्रदीप हा सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोळा सणानिमित्त वाघूर नदीवर बैल धुण्यासाठी गेला होता. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने वाघूर नदीला ब:यापैकी पूर आलेला आहे. प्रदीप हा बैलांना धूत असतांना अचानक नदीत असलेल्या खोल डोहात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दु:खद वार्ता कळताच गांवावर शोककळा पसरली आहे . प्रदीप हा जामनेर येथील धाडीवाल महाविद्यालयातील 11 वी कॉमर्सचा विद्यार्थी होता.नदीला काही तासांपूर्वीच आले होते पाणी पावसाने दडी मारल्याने कित्येक दिवसांपासून कोरडी असलेल्या वाघूर नदीत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने काही तासापूर्वीच मोठे पाणी आले होते. पोळा सणाच्या दिवशीच नदी भरून वाहू लागल्याने शेतक:यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. त्यामुळे आपले बैल व इतर गुरे ढोरे धुण्यासाठी त्यांची पावले आपोआप नदीकडे वळली होती. तर पोळ्यानिमित्त गावात सर्जा- राजाच्या पुजेची आणि त्यांना सजविण्याच्या तयारीत बळीराजा मगA असतांनाच ही दु:खद वार्ता धडकल्याने शोकाकूल वातावरण निर्माण झाले.