नंदुरबार : शेळी चोरीच्या वादातून दीड वर्ष वयाच्या बालकाचे अपहरण करून त्याला पाण्यात बुडवून ठार केल्याची खळबळजनक घटना लक्कडकोट, ता.तळोदा येथे घडली. तब्बल 21 दिवसांनंतर यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, लक्कडकोट येथील रायसिंग कांडय़ा पाडवी व पुन्या तारका वसावे यांच्यात शेळी चोरीप्रकरणी भानगड झाली होती. तो वाद पंचायत बसून मिटवण्यात आला होता. परंतु पुन्या वसावे याच्या मनात ती धग कायम होती. त्याच वादातून त्याने 1 सप्टेंबर रोजी दुपारी रायसिंगच्या घरात घुसून त्याची आई शिवलीबाई हिला धक्का मारून पाडले. झोक्यात झोपलेल्या दीड वर्षाच्या बालकाला उचलून घेऊन गेला. त्यानंतर गावाजवळील धरणाच्या पाण्यात त्याला बुडवून मारले. पाण्यातील बेशरमीच्या झाडालगत बालकाचा मृतदेह आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अधिक तपास केला असता खून झाल्याचे स्पष्ट झाले.
बालकाला पाण्यात बुडवून केले ठार
By admin | Updated: September 25, 2015 00:19 IST