शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

छतावरील दगड झोक्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 12:55 IST

तांबापुरातील घटना : ताडपत्री टाकताना तुटली दांडी

ठळक मुद्देमुलगा उठत नसल्याने आईचा आक्रोश़़़पाऊस व पार्टेशनच्या घराने केला घातजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी असदला मृत घोषीत केले.  

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 -  पावसाचे पाणी घरात येऊ नये यासाठी छतावर ताडपत्री टाकत असताना एक जीर्ण लाकडी दांडी तुटल्याने रऊफ हकीम पटेल (वय 28) हे छतावरील दगडासह घरात कोसळले, याचवेळी झोक्यात निजलेल्या दोन वर्षाच्या असद या बालकाच्या अंगावर दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी दीड वाजता तांबापुरातील अजमेरी गल्लीत घडली. या घटनेमुळे तांबापुरात शोककळा पसरली.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, रऊफ हकीम पटेल यांचे तांबापुरातील अजमेरी गल्लीत पार्टेशनचे लहानशे घर आहे. त्यात पत्नी साजेदा, मुलगी हुमेरा (वय 4), रोजमीन (वय 3), मुलगा असद (वय 2), बहिण फरीदा व तिचे दोन मुले, आई मेहमुदा यांच्यासह एकत्र वास्तव्याला आहेत. हातगाडीवर भंगार गोळा करुन त्यावर सर्वाचा उदरनिर्वाह चालतो. पार्टेशन व पत्र्याचे घर असल्याने पावसाचे पाणी घरात येत होते. त्यामुळे रऊफ पटेल हे  रविवारी दुपारी दीड वाजता छतावर ताडपत्री व प्लास्टीकचा कागद टाकण्यासाठी छतावर चढले असता  ही दुर्घटना घडली.  दांडी तुटल्यामुळे दगडासह रऊफ खाली कोसळल्याने जोराचा आवाज झाला. हा आवाज ऐकून असदची आई साजेदा धावतच आली व असदला जवळ घेऊन पाहिले तर तो काहीच बोलत नव्हता. तो का बोलत नाही म्हणून त्यांनी जोरात किंचाळी मारली, शेजारीही धावून आले. आवाज देऊनही असद उठत नव्हता, तर आईची स्थिती पाहता शेजारच्यांनी तातडीने असद याला जिल्हा रुग्णालयात तर त्याच्या वडीलांना खाजगी दवाखान्यात हलविले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी असदला मृत घोषीत केले.