महिलेच्या साथीदाराचा शोध !जळगाव : रामेश्वर कॉलनीतील किराणा दुकानावर दूध घेण्यासाठी जात असलेल्या सार्थक संदीप मुळे (९) या बालकाचा नाजीमा अब्दूल रज्जाक शेख उर्फ नाजीमा इस्माईल मुल्ला (३५, रा़ अंकलेश्वर, उमरवाडा़ गुजरात) या महिलेने दुसऱ्या ठिकाणी भिक मागण्याच्या उद्देशाने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता घडली़ दरम्यान, हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच महिलेस पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़रामेश्वर कॉलनीतील संदीप मुळे यांचा नऊ वर्षाचा मुलगा सार्थक हा शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घराजवळीलच किराणा दुकानावर दूध घेण्यासाठी घरातून बाहेर पडला़ दरम्यान, वाटेतच नाजीमा या महिलेने सार्थक यांचे तोंड दाबून त्याच्या कपड्यांमधील खिशांमध्ये हात टाकून खिशे तपासले़ त्यानंतर त्यास ओढून दुसऱ्या ठिकाणी भिक मागण्याच्या उद्देशाने अपहरण करून घेऊन जात होती़हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन महिलेजवळून बालकाची सुटका केली़ त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना बोलवून त्या महिलेस त्यांच्या ताब्यात दिले़ पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता ती अंकलेश्वर येथील रहिवासी असल्याचे सांगितले़शुक्रवारी दुपारी नाजीमा अब्दूल रज्जाक शेख या महिलेस एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर केले़ महिलेसोबत आणखी कुणी होते का? तिचे साथीदार कोण यांचा तपास घेण्यसाठी पोलिसांकडून पाच दिवसांची पोलीस कोठडीची न्यायालयाकडे विनंती करण्यात आली़ त्यानंतर सुनावणीअंती संशयित नाजीमा हिला न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड़ रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले तर पुढील तपास पीएसआय रमेश वाटोरे व सचिन मुंडे करीत आहेत़
बालकाचा अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:34 IST
महिलेला अटक
बालकाचा अपहरणाचा प्रयत्न
ठळक मुद्दे १० मार्चपर्यंत सुनावली कोठडी