शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

नुकसान भरपाईचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:17 IST

आ.किशोर पाटील यांनी घातले साकडे पाचोरा : पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकरी बांधवांना नुकसान ...

आ.किशोर पाटील यांनी घातले साकडे

पाचोरा : पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मदतीसाठी साकडे घातले. मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत कोरोनामुळे हवालदिल झालेल्या जनतेला यातून दिलासा देण्यासाठी शासनामार्फत भरघोस मदत देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

नुकत्याच पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील भिलदरी येथील प्रकल्प फुटल्याने तितूर आणि गढद नदीला महापूर येऊन पाचोरा तालुक्यातील ११ तर भडगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यात सुमारे ६० घरांची पडझड झाली असून अनेक घरांचे लहानमोठे नुकसान झाले आहे, तर सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. पाचोरा तालुक्यातील सावखेडा खुर्द गावाचा संपर्क तुटला होता. तसेच नगरदेवळा, कजगाव येथील पूलही वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय अनेक गावात इलेक्ट्रीक तारा तुटून व विजेचे खांब पडल्याने काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आ.किशोर पाटील यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल यांनी संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर केला होता.

---

फोटो

100921\save_20210910_135230.jpg

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आमदार किशोर पाटील