शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पाहुणचाराने मुख्यमंत्री भारावले

By admin | Updated: May 17, 2017 18:08 IST

आदिवासींशी संवाद साधून त्यांना आपलेसे करण्याचा प्रय} केला.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 17 - सातपुडय़ातील अतिदुर्गम भागात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींशी संवाद साधून त्यांना आपलेसे करण्याचा प्रय} केला. सोबतच आदिवासी बांधवांचा पाहुणचार, स्वागत व खास आदिवासींच्या पारंपारिक आहारातील स्वादीष्ट जेवण घेवून अक्षरश: मुख्यमंत्री भारावले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सातपुडय़ातील मोलगी व भगदरी या परिसरात आले होते. त्यांच्याहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन होऊन त्यांनी विविध कामांची पाहणीही केली. या वेळी भगदरी, ता.अक्कलकुवा येथे त्यांनी अमृत पाडवी यांच्या पारंपारिक झोपडीच्या घरात बसून तेथे त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. शिवाय आदिवासींच्या पारंपारिक बिगर दुधाचा चहादेखील घेतला. या वेळी माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी व आशा पाडवी यांनी त्यांचे पारंपारिक शिबली टोपली व धनुष्यबाण भेट देवून स्वागत केले. याच वेळी त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या आदिवासी पारंपारिक नृत्य पथकातील कलाकारांजवळ जावून त्यांची विचारपूस केली. उपस्थितांनी परिधान केलेल्या तुंबडी, टोप याबाबत माहिती घेतली.या नियोजित दौ:यात त्यांच्या भोजनाची व्यवस्था मोलगी येथील राजीव गांधी भवनात करण्यात आली होती. मात्र अधिका:यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी तेथे भोजन न घेता खास आदिवासी कुटुंबांकडे बनविलेल्या पारंपारिक भोजनाचा डबा सोबत घेतला. त्यात मेथी, पालक तसेच वांग्याचे भरित, हिरवी मिरची तसेच लाल मिरचीचा ठेसा, कैरीची चटणी, वरण-भात आणि मका तसेच  दादरच्या भाकरीचा समावेश होता. माजी आमदार नरेंद्र पाडवी व पिरसिंग पाडवी यांनी हा डबा त्यांना दिला.