शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मिठाई दुकानावर तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:49 IST

खवा, माव्यासह शेव बर्फीच्या एकूण ४५ नमुन्यांची तपासणी

जळगाव : अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने मंगळवारी सिंधी कॉलनीतील मे.जय जोगणिया स्वीटस अँड उपहारगृह या मिठाई दुकानावर तपासणी करून खाद्य पदार्थांचे नुमने घेतले. दरम्यान, सणासुदीच्या काळात दोन महिन्यांमध्ये एकूण ४५ नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतले आहे. सुट्टीच्या काळातही दोन अधिकारी तपासणीसाठी सज्ज राहणार असल्याची माहिती देण्यात आली.सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने तपासणी केली जात असून गेल्या आठवड्यात औद्योगिक वसाहत परिसरात खाद्य तेल व खाद्य पदार्थांचे नुमने घेतल्यानंतर मंगळवारी पुन्हा सिंधी कॉलनीतील मे.जय जोगणिया स्वीटस अँड उपहारगृह या दुकानावर उघड्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या कलाकंद बर्फी व शेव असे दोन खाद्य पदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गुजर यांनी तपासणीसाठी घेतले. सदरचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून नमुन्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. तपासणीदरम्यान दुकान मालकास स्वच्छते बाबतही सूचना देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.४५ नमुन्यांची तपासणीसणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आॅगस्ट महिन्यांपासूनच तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून गणेशोत्सव, दुर्गात्सव, दसरा यासह दिवाळीच्या काळात सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, विवेक पाटील, अनिल गुजर, सुवर्णा महाजन यांनी ४५ नमुने तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.घेतलेले नमुनेखवा, मावा, मिठाई - १५मैदा, बेसण, आटा - १२गावराणी तूप, वनस्पती तूप, खाद्य तेल, फरसाण - १८दोन अधिकारी सज्जदिवाळीच्या काळात सुट्या असल्या तरी भेसळयुक्त व निकृष्ठ पदार्थांची विक्री होऊ नये म्हणून प्रशासनाने सज्जता ठेवत सुट्टीच्या काळात दोन अधिकारी लक्ष ठेवून असल्याचेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.