शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मुदतबाह्य गॅस सिलिंडरच्या शोधासाठी वितरकांकडील सिलिंडर्सची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:11 IST

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना

ठळक मुद्दे खाजगी बसेसच्या भाड्यावर नियंत्रण ठेवावे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक

जळगाव: मुदतबाह्य गॅस सिलिंडरमुळे स्फोट होण्याच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. मात्र ग्राहक सिलिंडरची एक्सपायरी डेट बघत नाहीत. त्यामुळे स्फोट झालेल्या ठिकाणच्या सिलिंडर्सची तसेच वितरकांकडील सिलिंडर्सची जिल्हा पुरवठा अधिकाºयांमार्फत तपासणी व्हावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सदस्यांनी केली.जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी बैठकीत केलेल्या विविध सुचना व तक्रारींची तत्काळ सोडवणूक होणे आवश्यक आहे. सदस्यांनी केलेल्या तक्रारी ज्या विभागाकडे प्रलंबित असतील, त्या विभागाच्या प्रमुखांची लवकरच बैठक घेऊन या तक्रारी सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पुरवठा विभागास दिल्या. या बैठकीस शासकीय सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, अन्न व औषध विभागाचे व्ही. टी. जाधव, एम. एन. अय्यर, अ. ह. गुजर, दूरसंचार विभागाचे जे. एस. किनगे, वैद्यमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक सतिष अभांगे, आरोग्य विभागाचे डॉ. एम. पी. बावने, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रा. ना. घुले, पोलीस अधिक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी राजेंद्र होळकर, अशासकीय सदस्य रंजना पाटील, रविंद्र पाटील, नितीन बरडे, डॉ. अर्चना पाटील, पल्लवी चौधरी, धनंजय पाटील, अ‍ॅड मंजुळा मुंदडा, विकास महाजन, रमेश सोनवणे, विजय मोहरीर, शिवाजी अहिरराव, अ. फ. भालेराव, बाळकृष्ण वाणी, सतिष गडे, आण्णा धुमाळ, उज्वला देशपांडे, डॉ. प्रिती दोषी, सतिष देशमुख, कल्पना पाटील आदि उपस्थित होते.यावेळी बोलतांना गाडीलकर म्हणाले की, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागाशी प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करावी. ज्या विभागाकडे तक्रारी प्रलंबित असतील त्या विभागाच्या प्रमुखांना तशी समज देण्याच्या सूचनाही त्यांनी पुरवठा विभागास दिल्या.खाजगी बसेसच्या भाड्यावर नियंत्रण ठेवावेखाजगी ट्रॅव्हल्सचालक इतर दिवशी ४००-५०० रूपये भाडे असताना रविवारी १२०० ते १५०० रूपये भाडे आकारतात, अशी तक्रार विजय मोहरीर यांनी केली. त्यावर आरटीओ जयंत पाटील यांनी यावर त्यांचे नियंत्रण नाही. परिवहन खात्याला याबाबत कळवू असे आश्वासन दिले. रिक्षाचालकांनी आरटीओंची परवानगी न घेता केलेल्या भाडेवाढीबाबतही आरटीओंनी कारवाई केली नसल्याबाबतही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.या केल्या सूचनाया बैठकीत अशासकीय सदस्यांनी खाद्य पदार्थांमधील भेसळ तपासण्यासाठी शासकीय प्रयोग शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञच नसल्याने तपासणी अडली आहे. दिवाळीपासून केलेल्या कारवाईबाबतचे अहवाल अद्यापही मिळालेले नाहीत. हा विषय जिल्हाधिकाºयांनी मार्गी लावावा. बस स्टॅन्डवरील स्वच्छतागृह महिला व लहान मुलांसाठी मोफत असावे. अनधिकृतरित्या वाहनांवर प्रेस लिहिणे, प्रमुख रस्त्यांवर शाळा, महाविद्यालय असल्याचे फलक लावणे, वाळु उपश्यास परवानगी दिलेल्या ठिकाणांवरुन वाळूची वाहतुक करणाºया वाहनांना विशिष्ट रंग द्यावा. शहरातील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस होत असलेल्या अडथळयाबाबत तक्रारी व सुचना केल्यात.