शहरं
Join us  
Trending Stories
1
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
2
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
3
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
4
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
5
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
6
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
7
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
8
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
9
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
10
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
11
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
12
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
13
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
14
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
15
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
16
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
17
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
18
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
19
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
20
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे चोपडय़ाचे बालवीर हनुमान मंदिर

By admin | Updated: April 10, 2017 13:49 IST

साडे तीनशे वर्षापूर्वी स्थापन झालेले व चोपडा शहराचे ग्रामदैवत असलेले बालवीर हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे

 शिवकालिन मंदिर : शिवाजी महाराजांच्या सैन्याचा होता मुक्काम

चोपडा, दि.10- साडे तीनशे वर्षापूर्वी स्थापन झालेले व चोपडा शहराचे ग्रामदैवत असलेले बालवीर हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दहा हजार भाविकांसाठी भंडारा होत आहे.
चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवकालीन इतिहासात नोंद असलेली 350 वषार्पूवीर्चे ग्रामदैवत बालवीर हनुमान मंदिराचा  जीर्णोद्धार गेल्या वर्षी विधिवत पुजा करीत महामंडलेस्वर 1008 प पु संत बालयोगीजी महाराज यांचे हस्ते झाला. हनुमान जयंतीच्या निमित्ताने भाविकांची चोपडय़ाचे ग्रामदैवत असलेल्या बालवीर हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी होत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिर्णोद्धारासाठी 25 लाखांची लोकवर्गणी
350 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी  गेल्या वर्षी शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि हनुमान भक्तांनी लोकसहभागातून 25 लाख रुपयांच्या निधीचे संकलन करीत शिवाजी चौकात भव्य असे मंदिर उभारण्यात आले. या कलात्मक कार्यकुशलतेने उभारण्यात आलेल्या मंदिरामुळे शिवाजी चौकसह शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
शिवाजी महाराज यांच्या सैन्याचा मुक्काम
शिवकालीन असे हे मंदिर आहे. या मंदिरामुळे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने ते चोपडय़ातील नागरिकांचे ग्रामदैवत ठरले आहे. शिवाजी महाराज जेव्हा चोपडा मार्गे सुरतला सैन्यासह जात होते, तेव्हा या मंदिराच्या पाठीमागे सैन्याने मुक्काम केला होता असे जाणकार मंडळी सांगतात.
भाविकांकडून शेंदूर अर्पण
या मंदिरातील मूर्ती चे खरे रूप गेल्या 100 वर्षापासून कोणीही पाहिले नाही. कारण प्रत्येक भक्त या हनुमान मूर्तीवर शेंदूर टाकत आला आहे. त्यामुळे मूर्तीचे खरे रूप भक्त पाहू शकत नव्हते. गेल्या वर्षी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याने चोपडा येथील श्रद्धास्थान प.पू.महामंडलेश्वर योगीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार या मूर्तीवरील सर्व शेंदूर काढण्यात आला. त्यामुळे बालवीर हनुमान यांचे मोहक दर्शन भाविकांना झाले. 
10 हजार भक्तांसाठी भंडारा
गेल्या वर्षापासून हनुमान जयंतीच्या दिवशी दहा हजार भक्तांसाठी भंडारा केला जातो.मंदिराच्या नव्या स्वरुपामुळे परिसर प्रसन्न झाला आहे. हनुमान  जयंती असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात येत आहेत.  हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी दिवसभर या मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत.