शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

जळगावात महिलेचा पाठलाग करणा-याचा पाठलाग करून झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:59 IST

सततच्या त्रासामुळे बदलले होते पीडित महिलेने घर

ठळक मुद्देगुन्हा दाखलअचानक नजरेस पडल्याने पाठलाग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 11-  गेल्या सहा वर्षापासून त्रास देऊन महिलेचा पाठलाग करणा:या रफिक शेख मजीद (वय 40 रा. मन्यारवाडा, कोळी पेठ, जळगाव) याला बुधवारी दुपारी पाठलाग करतानाचा सापळा लावून रंगेहाथ पकडून झोडपण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. श्रध्दा कॉलनीत हा प्रकार घडला. रफिक याला अटक करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रफिक शेख मजीद याचे रथ चौकात इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. या दुकानाच्या कामासह प्लॉट खरेदी-विक्रीचेही काम करतो. पीडित महिला पूर्वी का.ऊ.कोल्हे शाळेच्या परिसरात वास्तव्याला होती. ही महिला मुलांना शिकवणीसाठी जायची तेव्हा रफिक हा त्यांचा पाठलाग करीत होता. सततच्या या प्रकारामुळे महिलेने तीन वर्षापूर्वी या परिसरातून घर बदलवून ते रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आल्या होत्या. गुन्हा दाखलरफीक याने केलेले कारनामे पीडित महिलेने व तिच्या पतीने पोलीस निरीक्षक रोहोम यांच्याकडे कथन केले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रफिक याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला कलम 354 (ड) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ कोळंबे करीत आहेत. अचानक नजरेस पडल्याने पाठलागरफिक हा काही दिवसापूर्वी या परिसरात आला होता, तेव्हा ही महिला मुलांना शिकवणीसाठी सोडायला जात असताना त्याच्या नजरेस पडली. तेव्हा त्याने  न कळत घरार्पयत पाठलाग केला. नेमके घर कुठे आहे हे पाहिल्यानंतर मुलांना शिकवणीला सोडण्याची व परत घेण्याची वेळ माहिती झाल्यानंतर त्या-त्या वेळी तो महिलेचा पाठलाग करु लागला. हा प्रकार वाढल्याने महिलेने पतीला घटना सांगितली. त्यांनी मित्र व नातेवाईकांच्या मदतीने सतत तीन दिवस सापळा लावला. बुधवारी श्रध्दा कॉलनी परिसरात महिलेच्या दुचाकीच्या शेजारी दुचाकी आणून अश्लिल हावभाव करताना आढळताच लोकांनी त्याला अडवून रस्त्यावरच झोडपले.पळून जाण्याचा प्रय} फसलाआपले बिंग फुटल्याची जाणीव होताच रफिकने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्याला पकडून ठेवत रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसही अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळावर पोहचले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी त्याची चौकशी केली तर पीडित महिलेने आपबिती कथन केली. दरम्यान, रफिक याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रोहोम यांनी दिली.दरम्यान, त्याच्या या कारनाम्यांची माहिती पीडित महिलेने दोन दिवसापूर्वीच रामानंद नगर पोलिसांना दिली होती. दरम्यान, पीडित महिलेचा पती स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीला आहे.