शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद रायसोनीसह १४ संचालकांवर दोषारोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमधील घोटाळा प्रकरणात संस्थेचे प्रमोद भाईचंद रायसोनी (५५,रा.बळीराम पेठ, जळगाव) ...

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमधील घोटाळा प्रकरणात संस्थेचे प्रमोद भाईचंद रायसोनी (५५,रा.बळीराम पेठ, जळगाव) यांच्यासह १४ संचालकांवर मंगळवारी न्यायालयाने अपहार, फसवणूक, कट रचणे, पुरावा नष्ट करणे आदी दोषारोप ठेवले. रायसोनी याच्यासह सर्वच संचालकांनी आम्हाला गुन्हा कबुल नसल्याचे सांगत आरोप फेटाळले. सर्व संशयितांना कारागृहातून व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे केले हजर करण्यात आले. पहिले सदर्थ सत्र न्यायाधीश आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात मंगळवारपासून राज्यातील सात गुन्ह्यांच्या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. दोषारोप ठेवल्यानंतर आता पुढील कामकाज १५ डिसेंबर रोजी होणार आहे.

जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी थोडक्यात गुन्ह्याची पार्श्वभूमी, संचालकांवर असलेले आरोप न्यायालयास सांगितले. यावेळी आरोपींचे वकील अकिल इस्माईल हे देखील हजर होते.

या सात खटल्यांमध्ये ठेवले दोषारोप

बीएचआरमध्ये ठेवीदारांची फसवणूक, अपहार प्रकरणात राज्यात ८१ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यात सात ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचे एकत्रित खटले न्या.हिवसे यांच्या न्यायालयात चालविले जात आहेत. त्यात सेलु (जि.परभणी), नालन पेठ (परभणी), खोलापुरी गेट (अमरावती), राजापेठ (अमरावती), सांगली, उदगीर शहर (लातूर) व खडकी (पुणे) यांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हे सुनावणीला सुरुवात झाली आहे. यापूर्वी रामानंद नगरसह पाच ठिकाणच्या खटल्यांमध्ये संचालक मंडळावर दोषारोप ठेवण्यात आले आहे. ८१ पैकी आतापर्यंत १२ ठिकाणच्या गुन्ह्यात दोषारोप केले आहे.

हे आहे अटकेतील संचालक

बीएचआरमध्ये झालेल्या अपहार व फसवणूक प्रकरणात शिवराम चावदस चौधरी (८०,रा.शिव कॉलनी) यांच्या फिर्यादीवरुन राज्यातील पहिला गुन्हा रामानंद नगर पोलीस ठाण्यात कलम ४०९,४२०,१२० ब व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम सन १९९१ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यात संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (६०,रा.बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडीया (५६), सुरजमल भबुतमल जैन (५५), दादा रामचंद्र पाटील (७१), भागवत संपत माळी (६८), राजाराम काशिनाथ कोळी (५२), भगवान हिरामण वाघ (६५), यशवंत ओंकार जिरी (६५)शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (६०),सुकलाल शहादू माळी (५०)ललिताबाई उर्फ लता राजू सोनवणे (४४) सर्व रा.तळेगाव, ता.जामनेर, मोतीलाल ओंकार जीरी (५५,रा.शेळगाव, ता.जामनेर), डॉ.हितेंद्र यशवंत महाजन (५७,रा.बेंडाळे नगर, प्रेम नगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४५,रा.महाबळ, जळगाव) यांना ३ फेब्रुवारी २०१५ रोजी अटक केली आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.