चोपडा,दि.11- तूर खरेदी संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ चोपडय़ात शिवसेनेतर्फे शिवाजी चौकात दानवे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला. त्यानंतर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन दिले.
तूर खरेदी संदर्भात रावसाहेब दानवे यांनी नुकतेच आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद चोपडय़ात उमटले. यावेळी शिवसैनिक व कार्यकत्र्यानी दानवे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी
यावेळी अमृतराज सचदेव, दीपक सिंग जोहरी, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहर प्रमुख तथा नगरसेवक महेंद्र धनगर,गटनेता न पा महेश पवार, राजाराम पाटील,आबा देशमुख,किशोर चौधरी,जगदीश मराठे, जिल्हा परिषद सदस्य हरिष पाटील, प. स सदस्य भरत बाविस्कर, सुनील बरडीया, रहीम बागवान,वासुदेव महाजन,प्रदीप बारी,दीपक माळी, मुखत्यार मिस्री,धीरज गुजराथी,रुपेश भालेराव,विक्की शिरसाठ यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.