शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

सीए अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून बदल

By अमित महाबळ | Updated: September 12, 2022 15:39 IST

भारतीय राज्यघटनेवरील पेपर प्रथमच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला

जळगाव : सीए अभ्यासक्रमात बदल केला जात असून, प्रॅक्टीकलवर अधिक भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दोन वर्षाची आर्टिकलशिप करावी लागणार आहे. पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम लागू होईल, अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे पश्चिम विभाग (डब्लूआयआरसी) चेअरमन सीए मूर्तझा काचवाला यांनी दिली. ते सीए असोसिएशन जळगाव शाखेत बोलत होते.

काचवाल म्हणाले, की भारतीय राज्यघटनेवरील पेपर प्रथमच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. फाउंडेशन उत्तीर्ण होईल त्यालाच पुढील संधी मिळतील. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या बरोबरीने आपला अभ्यासक्रम असावा या पद्धतीने त्याची रचना केली जात आहे. या अभ्यासक्रमाला सरकाकडून मंजुरी मिळताच २०२३ पासून तो लागू केला जाईल. त्यांनी जळगाव शाखेच्या कामगिरीचे व विविध उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी सचिव श्वेता जैन, पियूष चांडक, पिंकी केडिया, जळगाव शाखेचे अध्यक्ष विक्की बिर्ला, सचिव अभिषेक कोठारी उपस्थित होते. 

युडीआयएनचा आग्रह धरासीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डिजिटल लर्निंग हबवर अभ्यास साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच आर्थिक ताळेबंदावर सीएच्या स्वाक्षरीखाली युडीआयएन क्रमांक द्या. त्याची पडताळणी ऑनलाइन करता येते. यामुळे चुकीचे प्रकार टळतात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पहिल्यांदाच भारताला यजमानपदभारतात पहिल्यांदाच १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान, वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी ११० देशातून उपस्थिती लाभणार असून, सहा हजार जण प्रत्यक्ष, तर १० हजार जण व्हर्च्युअली हजेरी लावतील, असेही काचवाला यांनी सांगितले.

... तर सदस्यावर कारवाईएखाद्या सदस्याविरोधात कमिटीकडे तक्रार आल्यास त्याची दखल घेऊन चौकशी केली जाते. यामध्ये तथ्य आढळून आले, तर सदस्यत्त्वाचे निलंबन, डिबार किंवा आर्थिक दंड यासारखी कारवाई करण्यात येते. आजपर्यंत अनेक कारवाया झालेल्या आहेत, असेही काचवाला यांनी सांगितले.

टॅग्स :chartered accountantसीए