शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रात्रे दाम्पत्य' रंगलयं योगसाधनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:36 IST

'योगसाधना' पुस्तकाचे लेखन

जिजाबराव वाघचाळीसगाव : योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे आणि मीनाक्षी चंद्रात्रे यांच्या सप्तपदीची रेशीमगाठ 'योगा'शीही बांधली गेलीयं. गेले ४५ वर्ष हे दाम्पत्य एखाद्या व्रतस्थाप्रमाणे योगसाधनेत गढून गेले आहे. विशेष म्हणजे त्यांची ही योग समर्पित पालखी त्यांच्या स्नुषा सविता मानस चंद्रात्रे यांनी गेल्या काही वषार्पासून खांद्यावर घेतली आहे. संपूर्ण चंद्रात्रे कुटुंबच योग साधनेत रंगलयं.चाळीसगाव पंचक्रोशीत वसंतराव चंद्रात्रे यांची योगाचार्य अशी विशेष ख्याती आहे. गेली ४५ वर्ष ते विनामूल्य योगवर्ग घेत आहे. याचा हजारो लोकांना लाभ झाला असून योग शिबिरांमध्येही ते मार्गदर्शन करतात. मीनाक्षी व सविता या सासू - सुना रोज पहाटे महिलांना योग शिकवितात. यामुळे अनेक महिलांची शारीरिक व्याधीतून मुक्तता झाली असल्याचे त्या सांगतात. ८२ वर्षीय वसंतराव व मीनाक्षी हे दोन्ही ना.बं. वाचनालयात गेल्या ४३ वर्षांपासून मोफत योगाचे वर्ग घेतात. त्यांच्या क्लासमध्ये दरवर्षी योग दिन साजरा केला जातो.जनतेला आवाहन : योगभवन लोकसहभातून उभारले जाणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी १० लाख रुपये देण्याचे आश्वासित केले असून यात जनतेनेही पुढे यावे. यासाठी चंद्रात्रे यांचा जागर सुरू आहे.चाळीसगावात उभारणार 'योगभवन'गेल्या काही वर्षात धावपळीच्या जीवनशैलीत योग हा शरीराला फ्रेश करणारा ठरला आहे. अर्थात योगविद्या हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याच भावनेतून गेली ४५ वर्ष वसंतराव व मीनाक्षी चंद्रात्रे काम करीत आहे. चाळीसगावात 'योग भवन' उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. नेताजी चौकातील बलराम व्यायामशाळेच्या पटांगणावर हे योगभवन उभे राहणार असून त्यासाठी या दाम्पत्याचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी चंद्रात्रे यांच्या प्रयत्नातूनच बलाराम व्यायामशाळेचाही जीर्णोध्दार झाला.मिसाबंदिवानाचे मानधन दिले योगभवनासाठीआणीबाणीच्या कालखंडात वसंतराव चंद्रात्रे हे मिसा बंदिवान म्हणून तुरुंगात होते. येथेच ते योग शिकले. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने मिसा बंदिवानांचा सन्मान करताना त्यांना मानधन देऊन गौरविले. चंद्रात्रे यांनाही एक लाख २० हजारांचे मानधन मिळाले. यातील एक लाख रुपये त्यांनी योगभवनासाठी दिले आहे.'योगसाधना' पुस्तकाचे लेखनवसंतराव चंद्रात्रे यांनी आपल्या योगसाधनेचा ४५ वर्षांचा खजिना 'योगसाधना' या पुस्तकात रिता केला आहे. गेल्यावर्षी त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले. वर्षभरात त्याची यंदा दुसरी आवृत्ती देखील प्रसिद्ध झाली आहे.