शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

चांदसरची भावी डॉक्टर तरुणी पुण्यात अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 21:49 IST

जळगाव : पुण्यातील टिळक महाविद्यालयातून इंटर्नशिपच्या ठिकाणी दुचाकीने जात असलेल्या एकता प्रभाकर कोठावदे (वय २६, रा. मूळ चांदसर, ता. ...

जळगाव : पुण्यातील टिळक महाविद्यालयातून इंटर्नशिपच्या ठिकाणी दुचाकीने जात असलेल्या एकता प्रभाकर कोठावदे (वय २६, रा. मूळ चांदसर, ता. धरणगाव) या भावी डॉक्टर विद्यार्थिनीचा मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात पुणे-सातारा रस्त्यावर राजीव गांधी प्राणिसंग्रहालय चौकात झाला.चांदसर येथील एकता हिचे वडील प्रभाकर वसंत कोठावदे हे शेती करतात. आई मनिषा गहिणी तर भाऊ कुणाल हा उपसरपंच आहे. एकता हिने नाशिक येथे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ती पुणे येथे गेली. ती दोन वर्षापासून टिळक महाविद्यालयात एम.डी.चे शिक्षण घेत होती. इंटर्नशिपसाठी एकता ही तिच्या दुचाकीने (एम.एच.१९ ए.व्ही.९६२६) ने कात्रजकडे जात होती. यादरम्यान सातारा रस्ता, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय चौकात दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या माल मालवाहू (एम.एच.०८ डब्लू ३७४७) या वाहनाने दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.वाढदिवस आटोपून परतली होती पुण्यालाएकता ही आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांदसर येथे आली होती. ७ नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करुन ११ नोव्हेंबरला पुण्याला परतली होती. आयुर्वेद या विषयात ती एम.डी.शिक्षण घेत होती. शेवटचे दोन महिन्यांचे शिक्षण बाकी होते. मात्र नियतिला काही वेगळेच मान्य होते. सोमवारी अपघाताच्या रुपात काळाने घातलेल्या झडपेत तिचा मृत्यू झाला. माहिती मिळताच कुटुंबिय तातडीने पुण्याला रवाना झाले. पुणे येथून एकताचा चांदसरला आणण्यात येत असून मंगळवारी सकाळी ८ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.