शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चहार्डी येथे अटीतटीच्या  निवडणुकीत सरपंचपदाची माळ चंद्रकलाबाई पाटील यांच्या गळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 18:33 IST

एक सदस्य फोडण्यात चंद्रकलाबाई पाटील यशस्वी झाल्या.

ठळक मुद्देउपसरपंचपदी तुळशीराम कोळी एक सदस्य फोडण्यात चंद्रकला पाटील यशस्वी

चोपडा : लोकसंख्या आणि ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या चहार्डी ता.चोपडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया अतिशय चुरशीत पार पडली. गुप्त मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांना सतरापैकी नऊ मते मिळाली तर उपसरपंचपदी तुळशीराम धनराज कोळी यांची निवड झालेली आहे. त्यांनाही नऊ मते मिळाली.   चहार्डी येथे सतरापैकी एका गटात नऊ सदस्य तर दुसऱ्या गटात आठ सदस्य अशी स्थिती निर्माण झाली असताना आठ सदस्य असलेल्या गटाच्या चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांनी नऊ सदस्य असलेल्या गटातून एक सदस्य फोडल्याने सरपंच पदासाठी नऊ मते घेऊन ते विजयी झाल्या, तर नऊ सदस्य असलेल्या  गटातील  तुळशीराम धनराज कोळी यांना नऊ मते मिळाली. एक सदस्य फुटल्याने गेल्या दहा-बारा दिवसापासून सहलीला रवाना झालेल्या नऊ सदस्यांच्या गटाला धक्का बसला आणि सरपंच पद हातून गेले, तर आठ सदस्य असलेला गट ही चार-पाच दिवसापूर्वी सहलीला रवाना झालेला होता. मात्र पडद्यामागून सगळी सूत्रे हलवल्याने एक सदस्य फोडण्यात चंद्रकलाबाई पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे होत्याचे नव्हते तर नव्हत्या चे होते असा प्रकार चहार्डी येथे झाला.   सर्वप्रथम सकाळी दहापासून तर बाराच्या दरम्यान सरपंच पदासाठी दोन्ही गटाचे अर्ज दाखल करण्यात आले. आठ सदस्य असलेल्या गटाकडून चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांनी, तर नऊ सदस्य असलेल्या गटातील गणेश रमेश पाटील यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला.  उपसरपंचसाठी आठ सदस्य असलेल्या गटातील ललिताबाई जगन्नाथ  बिर्‍हाडे यांनी तर नऊ सदस्य असलेल्या गटातून तुळशीराम धनराज कोळी यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी दोननंतर प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाली. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच आठ सदस्य असलेल्या गटातील ग्रामपंचायत सदस्य डॉ.अनिल रामदास पाटील यांनी मतदान गुप्त पद्धतीने घ्यावे, असा लेखी अर्ज देऊन मागणी केली.  निवडणूक निर्णय अधिकारी तथा चहार्डी मंडळाधिकारी एस.एल. पाटील यांनी  मतदान गुप्त होईल असे सांगितले. सरपंच  व उपसरपंच पदासाठी समोरासमोर उमेदवार असल्याने मतदान पत्रिका बनवण्यात आली. सरपंच पदासाठी चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांना कप-बशी आणि गणेश रमेश पाटील यांना कपाट हे चिन्ह तर उपसरपंच पदासाठी  ललिताबाई जगन्नाथ  बिर्‍हाडे यांना कपाट तर तुळशीराम धनराज कोळी यांना कपबशी हे चिन्ह देण्यात आले. सर्व १७ सदस्यांना मतदान पत्रिका आणि बाण फुली देऊन गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. मतपत्रिका एका खोक्यात जमा करण्यात आल्या. त्यात सरपंच पदासाठी चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांना नऊ मते तर उपसरपंच पदासाठी तुळशीराम धनराज कोळी यांनाही नऊ मते मिळाल्याने आठ सदस्य संख्या असलेल्या गटाच्या सरपंच तर नऊ सदस्य असलेल्या गटाचे उपसरपंच निवडले गेले.    निवड झाल्यानंतर येथे मध्यवर्ती असलेल्या झाडवन चौकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नेमके काय होते हे ऐकण्यासाठी गावातील हजारो ग्रामस्थांनी गर्दी केलेली होती. काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र चोपडा शहर पोलिसांनी गावभर वाहन फिरवल्याने तूर्त शांतता झाली होती. मात्र एक सदस्य कोण फुटला याच्या शोधासाठी गावात धुमश्चक्री होण्याची चिन्हे आता निर्माण झाले आहे.   सरपंच व उपसरपंच निवडीसाठी पीठासन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजेश पवड, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी एस.एल.पाटील यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामविकास अधिकारी आर.एस.पारधी यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतChopdaचोपडा