शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

द्वादशीला मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : आषाढीला वैष्णवांच्या जनसागराने भरणारे चंद्रभागा तीर कोरोना पार्श्वभूमीवर निर्मनुष्य होते. भाविकांच्या भक्तिरसाने गर्जनारे अवघे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर : आषाढीला वैष्णवांच्या जनसागराने भरणारे चंद्रभागा तीर कोरोना पार्श्वभूमीवर निर्मनुष्य होते. भाविकांच्या भक्तिरसाने गर्जनारे अवघे चंद्रभागेचे वाळवंट सुने सुने होते. पोलिसांचा बंदोबस्त आणि वैष्णवांच्या प्रतीक्षेतील चंद्रभागा तीर अशात बुधवारी सकाळी ११ वाजता संत मुक्ताबाईंच्या पादुका स्नानासाठी पोहोचल्या. याप्रसंगी मृदुंगावर पडणारी थाप, टाळांचा मेंदूपर्यंत पोहोचणारा आवाज त्याला मुक्ताईसह पांडुरंगाच्या जयघोषाची साथ, मर्यादित वारकरी असतानाही ‘अवघे गरजे पंढरपूर चालला नामा’चा गजर असा भास जाणवत होता.

दशमीला पंढरीत दाखल झालेला संत मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताई मठात विसावला आहे. परंपरेप्रमाणे मठातून पांडुरंगाला नैवेद्य दिला जात आहे. मंगळवारी आषाढीला नगरप्रदक्षिणा केल्यानंतर बुधवारी द्वादशीला मुक्ताई पादुकांचे भक्तिभावाने चंद्रभागा स्नान पार पडले. तत्पूर्वी मठात लक्ष्मण महाराज वाघोदेकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर पालखी सोहळा चंद्रभागेतीरी पोहोचला. येथे पादुकांचे चंद्रभागा स्नान पार पडले. परतीच्या मार्गावर भक्त पुंडलिकाचे दर्शन करून वारी परत मुक्ताई मठात विसावली. भक्तिरसात तल्लीन वारकऱ्यांनी येथे फुगडीचा आनंद घेतला. दुपारी महंत यांचे कीर्तन झाले. सायंकाळी हरिपाठ अशी दिनचर्या राहिली.

मुक्ताई पादुकांच्या चंद्रभागा स्नानाप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पंजाबराव पाटील, सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे, पंकज महाराज, पांडुरंग पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीप झांबरे यांच्यासह दिंडीतील वारकरी उपस्थित होते.

फोटो नंबर- २२ आरएमएम ०४