शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

आव्हान देईल त्याला आडवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 11:49 IST

गुलाबराव पाटील यांची महाजन यांच्यावर टीका

ठळक मुद्दे ठाकरे यांची सभा म्हणजे ताकद दाखविण्याची संधी

जळगाव : आपण लंगोट घेऊन फिरणारे नाही तर बांधून फिरणारे आहोत. कुस्ती गादीवरची नाही मातीवर खेळणारे पहिलवान आहोत. शिवसेना संपविण्याची भाषा करणाºयांना धडा शिकविण्याची तयारी ठेवा. युतीचे टेंशन घेऊ नका, आव्हान देईल त्याला आडवा करा, असा जोरदार पलटवार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर शनिवारी येथे केला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौºयावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा खान्देशातील प्रचाराचा नारळ त्यांच्या हस्ते वाढविला जाण्याचे संकेत आहेत. यानिमित्त होणाºया जाहीर सभेच्या नियोजनासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी शनिवारी दुुपारी शिवसेनेचे जिल्हा, तालुका पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. सभेस माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विशेष संपर्क प्रमुख विलास पारकर, माजी आमदार आर. ओ.पाटील, चिमणराव पाटील, कैलास पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, संजय शिरोडकर यांची उपस्थिती होती.ही सर्वांसाठीच संधीलोकसभा निवडणूक, दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा दौरा असल्याचे सांगून गुलाबराव पाटील म्हणाले की, युतीचे टेंशन तुम्ही घेऊ नका त्याबाबत काय करायचे याचा निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील. आपण लंगोट घेऊन नाही तर बांधून तयार असतो आपण गादीवरची नाही तर मातीवर कुस्ती खेळणार पहेलवान आहोत.त्यांचे यश हे आमच्या मुळेजळगाव लोकसभा मतदार संघात प्रारंभापासून शिवसेनेचे प्राबल्य राहीले आहे. भाजपाकडे असलेल्या विधानसभा मतदार संघापेक्षा अधिक मताधिक्य अगदी एम.के. अण्णा पाटील यांच्यापासून शिवसेनेने दिले आहे. या भागात जि.प., पं.स. सदस्य, पंचायत समिती सदस्य हे आपले जास्त आहेत. त्यामुळे या मतदार संघावर खरा अधिकार शिवसेनेचाच आहे. शिवसेनेला संपविण्याची भाषा ते करतात त्यामुळे १५ ची सभा ही जास्तीत जास्त यशस्वी करून दाखविण्याची तुम्हाला संधी आहे. मागील निवडणुकीच्या वेळी इच्छा नसताना ए.टी. पाटील यांचा प्रचार करावा लागला. पक्षाचा आदेश होता. शिवसैनकाने प्रामाणिकपणे काम केले. धोका दिला नाही. ए.टी. पाटील हे खरे त्यामुळेच विजय झाले. पण आमचा विजय कामामुळे असे ते सांगतात असा चिमटा घेऊन बोहनीची ही सभा यशस्वी करा असे त्यांनी आवाहन केले.ताकद दाखविण्याची संधीउद्धव ठाकरे यांची सभा ही शिवसेनेची ताकद दाखविण्याची संधी असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यावेळी म्हणाले. प्रचार हा एक भाग असला तरी या जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळाने होरपळत असलेल्या जनतेचे दुख जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात येत आहेत. मी मंत्री झालो ते बाळासाहेबांमुळे ते त्यावेळी म्हणाले, दादा तुम्हाला कॉँग्रेसची ही लबाड मंडळी संधी देणार नाही. माझी सत्ता आली तर मी तुम्हाला मंत्री करेल व त्यांनी तो शब्द खरा करून दाखविला होता.आज उद्धव ठाकरे हे लढत आहेत ते तुमच्या स्वाभीमानासाठी युतीचे सरकार म्हटले जात पण तसा मान तुम्हाला मिळत नसल्याची चिड त्यांच्या मनात आहे ते घेतील तो निर्णय सर्वांच्या हिताचा असेल, पाडायला निघालेल्यांना चारीमुंड्या चित करण्याची धमक घेऊन कामाला लागा, असेही सुुरेशदादा यावेळी म्हणाले.प्रास्ताविक जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी तर सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले.

गाडण्याची भाषा करणाऱ्यांना गाडायुती करणार नसेल तर त्यांना गाडा असे बोलणाºया भाजपाच्या नेत्यांना गाडण्याची हिंमत ठेवा,असे संपर्क प्रमुख संजय सावंत यावेळी म्हणाले. राज्यात युतीची खरी गरज आपल्यापेक्षा भाजपाला जास्त आहे. कारण त्यांच्या नेत्यांना युतीसाठी उद्धवजींच्या भेटीसाठी यावे लागते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात जळगाव जिल्ह्यातून होत आहे त्यामुळे खान्देशच्या मातीतील ही सभा ऐतिहासिक ठरावी, असेही ते म्हणाले.लोकांचा राग त्यांच्यावरराज्यातील लोकांचा राग हा भाजपावर आहे मग आपण का त्या भट्टीत जायचे असा सवाल यावेळी माजी आमदार तथा सहसंपर्क प्रमुख आर. ओ. पाटील यांनी केला. विलास पारकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.जागा आपल्याकडे घ्याराज्यात युती होईल की नाही हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहे. पण युती झाली तरी जळगावची जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी केली. आज आपण सत्तेत असलो तरी भाजपा शिवसेनेला नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करत आल्याबाबत नाराजीही त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार चिमणराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Politicsराजकारण