शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी मातब्बरांचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

चाळीसगाव : ‘मिनी मंत्रालय’ असे वलय असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितींची मुदत अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ ...

चाळीसगाव : ‘मिनी मंत्रालय’ असे वलय असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितींची मुदत अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ रोजी संपत असल्याने निवडणुकांसाठी गट व गणांची माहिती संकलित करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील लोकसंख्येची आकडेवारी तहसीलकडून मागवली असून, अगामी काळात होणाऱ्या या घमासानासाठी मातब्बरांचा कस लागणार, हे स्पष्ट आहे. २०११च्या लोकसंख्येनुसारच आरक्षणही जाहीर होण्याची शक्यता असल्याने याबाबतही राजकीय क्षेत्रासह गावपातळीवर औत्सुक्य आहे.

जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समितींची मुदत अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ रोजी संपत आहे. जिल्हा परिषदेत ६७ गट, तर पंचायत समितींचे १३४ गण आहेत. तालुकानिहाय ग्रामीण भागातील लोकसंख्या प्रमाणित प्रपत्रामध्ये जिल्हा प्रशासनाकडून मागविण्यात आली आहे. चाळीसगाव तहसील प्रशासनालादेखील ४ जून रोजी असे पत्र प्राप्त झाले असून, प्रपत्रामध्ये लोकसंख्येची माहिती पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलच्या सूत्रांनी दिली.

...............

चौकट

सर्वपक्षीयांसाठी सामना चुरशीचा

२०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर आणि २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजेच २०१६ला या मिनी मंत्रालयांची रणधुमाळी झाली आहे. साहजिकच गत सव्वाचार वर्षात राजकारणाच्या पुलाखालून नवनवीन समीकरणांचे बरेच पाणी वाहून गेले आहे. २०२२मध्ये होऊ घातलेले घमासान म्हणूनच सर्वपक्षीयांसाठी चुरशीचेच ठरणार आहे.

- जिल्हा परिषदेच्या सात गटात राष्ट्रवादी भाजपपेक्षा वरचढ ठरला आहे. सातपैकी चार जागांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला तर तीन जागांवर भाजपचे कमळ उमलेले होते.

- बहाळ - कळमडू, सायगाव - उंबरखेडे, रांजणगाव - पिंपरखेड, तळेगाव - देवळी हे चार गट राष्ट्रवादीने राखले होते. भाजपने दहिवद - मेहुणबारे, टाकळी प्र.चा. - करगाव, वाघळी - पातोंडा यागटांमध्ये मुसंडी मारली होती.

- या सात गटांपैकी अनु. जमाती, ना.मा.प्र.महिला असे दोन गट महिलांसाठी राखीव आहे.

- सर्वसाधारण प्रवर्गाचे तीन, तर ना.मा.प्र.चे दोन अशी आरक्षणाची स्थिती आहे.

...........

चौकट

आरक्षणाबाबत मोठी उत्सुकता

ओबीसींच्या आरक्षणाचे त्रांगडे तसेच असल्याने निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वी जाहीर होणाऱ्या आरक्षणाबाबतही मोठी उत्सुकता आहे. आरक्षणानंतरच खरी स्थिती स्पष्ट होईल. अर्थात मातब्बरांकडून आतापासूनच ‘सेफ झोन’ची चाचपणी केली जात आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा रणधुमाळीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही रंगीत तालीम ठरणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नव्याने समीकरणे अस्तित्वात येतील.

..............

चौकट

----

1...कळमडू, सायगाव, उंबरखेड, रांजणगाव, पिंपरखेड, देवळी, तळेगाव या सात गणांमध्ये राष्ट्रवादीने विजयी गुलाल उधळला.

2...भाजपने बहाळ, पातोंडा, दहिवद, मेहुणबारे, करगाव, टाकळी प्र.चा., वाघळी हे सात गण काबीज केले होते.

3...सामना बरोबरीत सुटला असला तरी, पहिल्या टर्ममध्ये सभापती, उपसभापती निवडीत भाजपने राष्ट्रवादीला चेकमेट दिला. दुसऱ्या टर्ममध्ये मात्र राष्ट्रवादीने याची परतफेड करीत पं.स.वर झेंडा रोवला.

............

चौकट

स्वबळाचे शड्डू

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, अगामी निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे शड्डू अधून-मधून तीनही पक्षांकडून ठोकले जात असतात. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पंचरंगी सामना रंगू शकतो. महाविकास आघाडी मिळून निवडणुका लढविल्या गेल्यास मविआ विरुद्ध भाजप अशीही रणधुमाळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण व माजी आमदार राजीव देशमुख यांची प्रतिष्ठा यासाठी पणाला लागणार आहे.

..........

महत्त्वाची चौकट

चाळीसगावच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या तीन लाख १७ हजार ३२८

जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या २०२२ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका २०११च्या जनगणनेनुसार होतील. यासाठी तहसील प्रशासनाने ग्रामीण भागातील लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाला पाठवली आहे.

एकूण लोकसंख्या (ग्रामीण)

- ३,१७,३२८

अनु.जाती - ३१,४४२

अनु. जमाती - ४२,३३२

...........

पक्षीय बलाबल

जि.प. एकूण सात गट

राष्ट्रवादी - ४

भाजप - ३

पंचायत समिती एकूण गण - १४

भाजप - ७

राष्ट्रवादी- ७

...........

इन्फो

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आगामी निवडणुकीसाठी ग्रामीण भागाची लोकसंख्या पाठविण्यासंबंधी गतआठवड्यात जिल्हास्तरावरून पत्र मिळाले आहे. त्यानुसार पत्रामध्ये लोकसंख्येविषयी माहिती पाठवली आहे.

- अमोल मोरे

तहसीलदार, चाळीसगाव