शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला चोरट्यांकडून १४ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:32 IST

पहिलवान चोरट्यावर पोलिसांनी झडप घालून त्याच्याकडून चोरीच्या १४ मोटारसायकली हस्तगत केल्या.

चाळीसगाव : ओळखीच्या लोकांना चोरीच्या मोटारसायकली विकणाऱ्या पहिलवान चोरट्यावर शहर पोलिसांनी झडप घालून त्याच्याकडून चोरीच्या १४ मोटारसायकली हस्तगत केल्या. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. टाकळी प्र.चा. परिसरातील शिवशक्ती नगरातील राजेंद्र खंडू पवार यांची ३० हजार रुपये किमतीची एम.एच.- १९ सी. पी. १९९२ ही मोटारसायकल २० मे ते २१ मे २०१९ च्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. त्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत असतांना एक संशयीत आरोपी शहरातील मार्केटच्या जवळ मोटारसायकल घवून संशयीतरित्या व विक्री करावयाची असल्याचे सांगत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे फौजदार युवराज रबडे, पोलीस हवालदार बापुराव भोसले, पोलीस अभिमन पाटील, राहुल पाटील, विजय शिंदे, नितीन पाटील, संदीप तहसीलदार, प्रेमसिंग राठोड, पो.कॉ. राहुल गुंजाळ, पवीण सपकाळे, गोपाल बेलदार, तुकाराम चव्हाण, संदीप पाटील, भगवान माळी, गोवर्धन बोरसे यांनी त्याठिकाणी सापळा रचून आरोपी जय शरद पवार (२०) रा. पाटखडकी ता. चाळीसगाव यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याने विंचूर फाटा येथून १, मनमाड रेल्वे पुलावरुन २, नांदगाव रेल्वे स्टेशन वरुन ३, जळगाव रेल्वे स्टेशन १, गिरणा डॅम २, लासलगाव रेल्वे स्टेशन १, कजगाव १, नाशिक १ व इतर ठिकाणाहून ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या एकूण १४ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी जिम मध्ये व्यायमासाठी जात असल्याने तेथील लोकांना विश्वासात घेवून त्यांना मोटारसायकली विकल्याची कबुली त्याने दिली आहे.