शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

चाळीसगाव तालुक्यात रात्र वैऱ्याची अन् दिवसा धडपड जगण्याची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:23 IST

पोटाची खळगी भरण्याची नागरिकांना चिंता : बिबट्याच्या दहशतीने जगणे झाले कठीण

ठळक मुद्देबिबट्याने कुत्र्याच्या सात पिलांचा पाडला फडशावाडे शिवारातही बिबट्याचा संशयतळई येथे बिबट्याच्या भीतीने मजुरांची धावपळ

आॅनलाईन लोकमतवरखेडे, ता.चाळीसगाव,दि.२ : गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याने या भागात उच्छाद मांडला आहे. यामुळे येथील नागरिकांना रात्र वैºयाची, तर दिवसा मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करावी लागत आहे.दिवसा शेतात काम करताना बिबट्या कुठून येईल, हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. सहकारी सोबत असल्यामुळे दिवस तर निघून जातो, मात्र रात्र निघता निघत नाही. घराबाहेर साधी मांजरदेखील आली तरी अंगात धडकी भरते, झोप मोडली की, पुन्हा झोप लागत नाही. अंगणात बांधलेल्या गायीची काळजी वाटते.बिबट्याने कुत्र्याच्या सात पिलांचा पाडला फडशावरखेडे येथील गिरणा नदी पात्रातील भुराठचा पानथा येथे पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याच्या सात पिलांचा फडशा पाडला.वरखेडे खुर्द येथे बिबट्याचा हैदोसवरखेडे खुर्द येथील झोपडपट्टीजवळ बिबट्याने रात्री साडेनऊपासून अकरापर्यंत धुमाकूळ घातला. येथे असलेले माजी पोलीस पाटील ओंकार शंकर तिरमली यांच्या घराबाहेर बैलजोडी बांधलेली होती. बैलजोडीकडे बिबट्या येत असल्याचे कुत्र्यांनी पाहिले. तेव्हा मोठ्याने भुंकत कुत्र्यांनी वस्तीतील नागरिकांना जागे केले. यानंतर वस्तीवरील नागरिकांनी बिबट्याला पळवून लावले. मात्र तरीही बिबट्या पुन्हा आला असे तीन वेळा घडले. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी आल्याने बिबट्या पसार झाला.वाडे शिवारातही बिबट्याचा संशयभडगाव-तालुक्यातील वाडे शिवारात संजय भोपाल परदेशी हे सकाळी म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले. तेव्हा अचानक गायी-म्हशी ओरडून खुंट्यांवरील दोर तोडण्याच्या प्रयत्नात होते. ही बाब परदेशी यांच्या निदर्शनास येताच त्यांना बाजुच्या केळीतून प्राणी पळण्याचा आवाज आला. केळी बागेत पायाचे मोठे ठसे पाहता ते बिबट्याचे असावेत, असा त्यांना संशय आहे. ही माहिती त्यांनी इतरांना कळविली. नागरिकांनी घटनास्थळी लाठ्या-काठ्यांसह पाहणीही केली. तसेच बाजूच्या सुरतसिंग सरदारसिंग परदेशी यांच्या केळी बागेतही बिबट्याच्या पायाचे ठसे असावेत, असे नागरिकांनी सांगितले़तळई येथे बिबट्याच्या भीतीने मजुरांची धावपळतळई, ता. एरंडोल येथे नाना गजमल पाटील यांच्या शेतात शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने मजुरांची धावपळ उडाली.बिबट्यास जेरबंद करण्यासाठी गस्तीपथक व खुले भक्ष्य पथक यांची फेररचना करण्यात आली आहे. तसेच कॅपेरा ट्रॅपची संख्याही आता बारापर्यंत वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याChalisgaonचाळीसगाव