शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यात शेतक-यांचा एल्गार, वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 15:04 IST

आडगाव येथे सोमवारी सकाळी आठ वाजता शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले.

ठळक मुद्देआडगावला सरकारविरोधी घोषणांनी दणाणला परिसरएक तास वाहतूक रोखून धरलीचाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर वाहनांच्या रांगा

चाळीसगाव: 'अरे कोण म्हणतो देणार नाही...घेतल्याशिवाय राहणार नाही, दुधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे...' अशी जोरदार घोषणाबाजी करीत आडगाव येथे सोमवारी सकाळी आठ वाजता शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले. तालुकाध्यक्ष आर.के.पाटील यांनी नेतृत्व करतांना एक तास वाहतूक रोखून धरली. यामुळे चाळीसगाव - मालेगाव रस्त्यावर वाहनांची लांब रांग लागली होती.दुधाचे दर पडल्याने शेतकरी आणि पशुपालक कमालीचे धास्तावले आहे. खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी दुध व्यवसायाची स्थिती असल्याने सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलक शेतक-यांनी परिसर दणाणून टाकला.सद्यस्थितीत शेतांमध्ये खरीप हंगामाची लगबग सुरु असतांनाही सकाळी सात वाजेपासून शेतक-यांनी आडगाव बसस्थानकावर गर्दी केली होती. तीनशेहून अधिक शेतकरी, पशुपालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सरकार शेतक-यांच्या मागण्यांबाबत पुर्णपणे उदासिन आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही निर्धार केला आहे.- आर.के.पाटीलतालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावFarmer strikeशेतकरी संप