शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव पालिकेच्या मुख्याधिका-यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 17:12 IST

चाळीसगाव पालिकेत पुन्हा सहा महिन्यातच ‘प्रभारीराज’ आले आहे. 

ठळक मुद्देसहा महिन्यातच पुन्हा ‘प्रभारीराज’दीड वर्षानंतर मिळाले होते पूर्णवेळ मुख्याधिकारी

चाळीसगाव : येथील पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची अहमदनगर येथे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पदोन्नत्तीवर बदली झाली असून, ते शुक्रवारी रुजूही झाले आहे. पालिकेत पुन्हा सहा महिन्यातच ‘प्रभारीराज’ आले आहे. अनिकेत मानोरकर यांची पंढरपूर पालिकेत बदली झाल्यानंतर चाळीसगाव पालिकेला दीड वर्ष पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले नाही. कधी भडगाव पालिकेचे मुख्याधिकारी विकास नव्हाळे, तर कधी चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रभारी म्हणून पालिकेचा गाडा हाकला.सहा महिन्यापूर्वी १३ अॉगस्ट रोजी शंकर गोरे हे मुख्याधिकारी म्हणून चाळीसगाव पालिकेत रुजू झाले होते. त्यांनी यापूर्वीही येथे सेवा बजावलेली होती. सद्य:स्थितीत शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होतो. प्रशासकीयदृष्ट्यादेखील अनेक कामांना ब्रेक लागतो. सहाच महिन्यात मुख्याधिका-यांना बदलीचा खो मिळाल्याने पालिकेच्या वर्तुळात नाराजीचा सूर उमटला आहे. सद्य:स्थितीत पालिकेच्या राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी घडत असून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये शह-काटशह सुरू होत आहे. शहरातील सुविधांबाबत नाराजीची तक्रार असतानाच मुख्याधिका-यांचीही बदली झाली आहे. भडगाव पालिकेचे मुख्याधिकारी विकास नव्हाळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. विद्यमान सदस्यांच्या सत्ताकाळाचे काही महिने शिल्लक राहिले आहेत. वर्षअखेरीस पालिकेची निवडणूकही असल्याने विकासाची कामे त्वरीत मार्गी लागावीत, अशी शहरवासियांची अपेक्षा आहे. लवकरच शासनस्तरावर पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावे. याची मागणी करणार असल्याचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी 'लोकमत'ला सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारChalisgaonचाळीसगाव