शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला आजी-माजी नगरसेवक पुत्रांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:38 IST

मागील भांडणाचे कारण : परस्पर विरोधी गुन्हा दाखल

चाळीसगाव : मागील भांडणाच्या कारणावरून आजी-माजी नगरसेवकांच्या पुत्रांमधील वादाची ठिणगी पुन्हा उफाळून आल्याने दोन्हीही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा २७ रोजी रात्री उशिरा झाला आहे. या हाणामारीत आजी-माजी नगरसेवक, त्यांचे पुत्र व अन्य जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून २८ रोजी नगरसेवक आण्णा कोळी यांचे दोन्ही पुत्र यांचेसह पाच जणांना अटक केली आहे.याप्रकरणी २८ रोजी नगरसेवक आण्णा कोळी यांचे पुत्र सिद्धार्थ कोळी,सौरभ कोळी यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहिल्या घटनेत माजी नगरसेवक रमेश विक्रम चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नगरसेवक आण्णा चिंधा कोळी, सिद्धार्थ कोळी, सौरभ कोळी, वसंत कोळी, अक्षय कुमावत, लखन कुमावत, वैभव रोकडे, राहुल कोळी यांनी २७ रोजी दुपारी अडीच वाजता रमेश चव्हाण यांच्या रामवाडी येथील घरासमोर मागील भांडणाच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ व दगडफेक केली तर सिद्धार्थ कोळी व सौरभ कोळी यांनी तलवार हवेत मिरवून दमबाजी करून शिवीगाळ केली. या तक्रारीवरून पोलीसात दंगलीचा गुन्हा केला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक आशिष रोही करीत आहे. तर नगरसेवक आण्णा कोळी यांच्या गटाकडून जयश्री कैलास मोरे रा.चाळीसगाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २७ रोजी दुपारी दीड वाजता रमेश चव्हाण, त्यांचे पुत्र मोहन चव्हाण,पवन चव्हाण, रोहन चव्हाण यांचेसह चार ते पाच जणांनी घाटरोडवरील कोळी महा संघाच्या कार्यालयाचे शटर तोडून अनधिकृतरित्या प्रवेश करून टेबल, खुर्च्या व समानांची तोडफोड केल्याची तक्रार दिली. सर्वांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याप्रमाणे व दंगलीचा गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे करीत आहे.