शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवेसाठी आता चक्करबर्डीची वारी!

By admin | Updated: March 14, 2016 00:22 IST

धुळे : शहरातील जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर चक्करबर्डी येथील नवीन इमारतीत सुरू असून आजपासून रुग्णालय नवीन इमारतीत सुरू होणार आह़े

धुळे : शहरातील जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर चक्करबर्डी येथील नवीन इमारतीत सुरू असून आजपासून रुग्णालय नवीन इमारतीत सुरू होणार आह़े त्यानुषंगाने नवीन इमारतीत मोजकी तयारी झाली असून व्यवस्थाही बेताचीच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आल़े

ब:याच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर चक्करबर्डी येथील नूतन इमारतीत होत आह़े 10 ते 12 खासगी वाहनांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व रुग्णालय प्रशासनाच्या रुग्णवाहिकांमधून साहित्याची वाहतूक ेअजून सुरू आह़े नूतन इमारतीत अत्याधुनिक आयसीयू तसेच प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे तयार करण्यात आला आह़े अर्थात रुग्णालय स्थलांतरित झाल्यानंतर सर्व सुविधा उपलब्ध होण्यास साधारण महिनाभराचा कालावधी लागणार आह़े इमारतीच्या आवारात अल्पोपाहार केंद्रदेखील उपलब्ध असणार आह़े त्याचप्रमाणे नवीन इमारत तीन मजली असून रुग्णांसाठी लिफ्टची व्यवस्थादेखील उपलब्ध करून देण्यात आली आह़े दोन लिफ्ट रुग्णांना सुविधा पुरविणार आह़े

अपघात विभागाचे उद्घाटन

जिल्हा सवरेपचार रुग्णालयातील अपघात विभागासह प्रसूती, बर्न विभाग व अन्य विभाग नवीन इमारतीत सुरू केले जाणार असून सोमवारी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ सतीशकुमार गुप्ता यांच्या हस्ते छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम होणार आह़े तसेच दोन महिलांची प्रसूती व अपघातग्रस्तांवरील शस्त्रक्रियांनी या विभागांचे कामकाज सुरू केले जाणार असल्याची माहिती रुग्णालय अधीक्षक डॉ़ अनंत बोर्डे यांनी दिली़

वाहतुकीचा प्रश्न

शहरातून चक्करबर्डी येथील रुग्णालयात जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था तोकडी पडण्याची शक्यता आह़े दोन 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांसह 1 रुग्णालयाची रुग्णवाहिकादेखील वाहतुकीची सुविधा देणार आह़े

ग्रामीण भागातील रुग्णांनी चक्करबर्डीलाच यावे

ग्रामीण भागातील नागरिकांनी यापुढे रुग्णांना शहरात न आणता थेट चक्करबर्डीलाच आणावे, जेणेकरून रुग्णांवर उपचार करण्यास विलंब होणार नाही, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आह़े ग्रामीण भागातील बहूतांश रुग्ण 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी येत असल्यामुळे त्यांना यापुढे चक्करबर्डीला नेण्यात येणार आह़े ऐन उन्हाळ्यात जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर झाल्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचे हाल होणार आहेत़