शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडून होणार जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथील सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 15:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथे केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

जामनेर, जि.जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथे केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण केंद्रीय पथकाकडून करण्यात येणार आहे. १८ ते २२ मे दरम्यान केंद्रीय टीम जळगाव जिल्ह्यात दाखल होतील.देशात विषाणू तपासणी व संशोधनाचे कार्य करणाऱ्या पुणे येथील इंंिडयन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च ही संस्था सदर सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात रॅपिड टेस्टसुद्धा करण्यात येणार आहे. येथून सॅम्पल पुणे येथील नॅशनल व्हायरॉलॉजी लॅबला पाठवण्यात येणार असून, नंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावरून २० गाड्या, आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग, पी.पी.ई. किट व आवश्यक साधन सामग्री सदर टीमला पुरवण्यात येणार आहे.तहसीलदारांकडून पुरेसे पोलीस संरक्षण,आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी पुरवण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सदर दिवशी सर्वेक्षणाच्या गावात उपस्थित राहणार आहे. या गावासाठी रवींद्र सूर्यवंशी यांनी पथक प्रमुख म्हणून तालुकास्तरावरून नेमणूक करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर तालुका स्तरीय टीमने सदर गावाला भेट देऊन सर्वेक्षणाबाबत नागरिकांचे समुपदेशन केले व कोरोना आजार ब प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या टीममध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मनोज तेली, बशीर पिंजारी, एस.पी.नागरगोजे, सुशीला चौधरी, बी.के.साळुंके, एम.एस.परदेशी गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीसांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर