शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
4
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
5
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
6
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
7
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
8
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
9
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
10
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
11
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
12
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
13
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
14
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
15
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
16
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
17
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
18
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
19
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
20
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून केंद्रीय समितीही हळहळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 3:57 PM

विश्लेषण

-सुशील देवकर

जळगाव: दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीने दुष्काळी भागात जाऊन पाहणी करताना स्थानिक शेतकºयांशीही मनमोकळा संवाद साधला. दुष्काळी परिस्थिती पाहून समिती सदस्यही हळहळले. दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याबाबत त्यांचे मत दिसून आल्याने मदतीबाबत समिती सदस्य सकारात्मक दिसून आल्याचे समजते.बुधवारी सायंकाळी औरंगाबादहून जळगाव जिल्ह्यात आगमन करतानाच समितीने जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत या गावाला भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. तर गुरूवारी सकाळी पारोळा तालुक्यातील  दगडी गावाकडे रवाना झाली. तेथे कपाशीच्या शेताची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी संवाद साधला. चाºयाअभावी गुरेढोरे विकावी लागल्याचे शेतकºयांनी या समितीला सांगितले. तर अमळनेर तालुक्यातील जुनोने गावाला भेट दिली. तेथे शेतातील तुरीच्या शेंगा फोडून पाहिल्या. त्यावेळी त्यात कीड आढळून आले. समितीच्या सदस्यांनी शेतकºयांना पाणी कुठून आणता? किती दिवस चारा पुरेल? कर्ज कुठून घेतले? आदी बाबत विचारणा केली. अमळनेर तालुक्याची परिस्थिती जिल्ह्यात सर्वात बिकट आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून समितीचे सदस्यही हेलावले. परिस्थिती गंभीर असल्याबाबतच्या मताशी सहमत असल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्राकडे मदतीसाठी समितीकडून शिफारस होण्याची शक्यता वाढली आहे.  दुष्काळ पाहणीसाठी यापूर्वी राज्यातील दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौरा केला होता. मात्र हा दौरा खूपच धावता व सोयीचा होता. महामार्गालगतच्या गावांमध्येच जाऊन पाहणीची औपचारीकता उरकण्यात आली होती. त्याउलट अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असलेल्या केंद्रीय समितीनेही धावता दौराच केला. मात्र समितीने जेथे भेट दिली, तेथे आवश्यक त्या मुद्यांची योग्यरितीने चौकशी केली व पाहणी केली. जिल्हा प्रशासनानेही या समितीसाठी योग्यरितीने गावांची निवड केली. गुरूवारी दुपारी ही समिती धुळ्याहून नाशिककडे समिती रवाना झाली. मात्र जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र निश्चितपणे ही समिती केंद्राकडे मांडेल, अशी आशा जनतेला निर्माण झाली आहे.