शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भजन, कथाकथन, गीत गायनाने रंगला गोकुळाष्टमीचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:57 IST

विद्यार्थ्यांनी साकारली राधा-कृष्णाची वेशभूषा : घरीच फोडली चिमुकल्याची दहीहंडी

जळगाव : शहरातील शाळांकडून गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घरीच राधा-कृष्णाची वेशभूषा साकारून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. नंतर प्रसाद वाटप करण्यात आले. तसेच शाळांकडून आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन, गीत गायन, भजन आदी आॅनलाईन स्पर्धांनी गोकुळष्टमीच्या उत्सवात रंगत आणली होती. तर रित संदीप पाटील या चिमुकल्या विद्यार्थिनीनेही श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होती.राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालयमेहरूण परिसरातील राज प्राथमिक माध्यमिक व सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज येथे गोकुळाष्टमी व दहीहंडी कार्यक्रम आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. नगरसेविका जयश्री महाजन यांनी श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमी व दहीहंडी यांचे शास्त्रीय महत्व सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा यांची वेशभूषा साकारली होती.किलबिल बालक मंदिरकिलबिल बालक मंदिर शाळेत गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी व शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून गोकुळाष्टमी साजरी केली. त्यानंतर शिक्षकांनी भजन म्हटले़ तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये दहीहंडी साजरी न करता विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा साकारली होती.डॉ. अविनाश आचार्य विद्यालय विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात आॅनलाईन व्हिडिओव्दारे गोकूळाष्टमी सण साजरा केला. यावेळी कार्यक्रम प्रमुख विद्या वाडकर यांनी भगावन श्रीकृष्णाबद्दलची माहिती सांगून गोपालकाल्याचे महत्त्व स्पष्ट केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, गोपिका या वेशभुषेत गोपालकाला बनवून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी शिक्षिकांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव