शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 18:40 IST

सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देकापसाला ५०० रू. बोनस देण्याबाबत पाठपुरावा करणार -आमदार चिमणराव पाटीलहमी भावाची खरेदी५५०० रु चा मिळाला भाव

पारोळा, जि.जळगाव : येथील ओम नमोशिवाय जिनिंग केंद्रावर भारत सरकारच्या भारतीय कापूस महासंघ अर्थात सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. गुजरात राज्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना ५०० रुपये कापसाला बोनस द्यावा या मागणीसाठी आपण विधानभवनात विषय मांडून स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी दिले.अध्यक्षस्थानी पणन महासंघाचे संचालक संजय पवार तर अतिथी म्हणून बाजार समिती सभापती अमोल पाटील, जळगाव बाजार समिती संचालक लक्ष्मण पाटील, सहाय्यक निबंधक जी.एच.पाटील, व्यवस्थापक आर.जी.होले, सेना नगरसेवक मंगेश तांबे, शेतकी संघ अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भिकन महाजन व बाजार समिती संचालक चतुर पाटील, मधुकर पाटील, डॉ.पी.के.पाटील, प्रा.बी.एन.पाटील अर्जुन पाटील, सखाराम चौधरी, बाजार समिती सचिव रमेश चौधरी, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अशोक पाटील, प्रमोद जाधव,पांडुरंग पाटील, प्रा.आर.बी.पाटील, दगडू पाटील, सुधाकर पाटील तसेच ओमनमोशिवाय जिनिंग संचालक दयाराम पाटील, संजय पाटील, भगववन मोरे, पांडुरंग मोरे, रवींद्र मराठे, चंद्रकांत वाणी, देवीदास वाणी उपस्थित होते.यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. विजय गंभीरराव पाटील, चोरवड या शेतकºयाचा माल प्रथम मोजला गेला. कापसाची प्रतवारी, त्यात असलेला ओलावा(आर्द्रता) पाहून केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार कापसाला भाव दिला जाणार आहे. सद्य:स्थितीत प्रथम आवकच्या मालाला ५५०० प्रमाणे भाव दिला जात असला तरी मालात ओलावा जास्त राहिल्यास भाव कमी होईल, असे संकेत केंद्रप्रमुख व अधिकारी आर.जी होले यांनी सांगितले.आपल्या अध्यक्षीय मनोगतात संजय पवार यांनी शेतकऱ्यांनी कापूस आणताना कोरडा आणावा म्हणजे भाव योग्य मिळेल. तसेच पेमेंट हे अवघ्या दोन दिवसात आॅनलाईन टाकले जाईल. आमदार पाटील यांनी कापूस पणन विभागाच्या अडचणी, शेतकी संघाचा कापूस खरेदीत नसलेला सहभाग व कापसाला ५०० रु. बोनस मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :cottonकापूसParolaपारोळा